Buldhana News: गेल्या २४ तासांत बुलढाणा जिल्ह्यात काही भागांत ढगफुटीसदृश पावसाने थैमान घातले. प्रामुख्याने सोनोशी (ता. सिंदखेडराजा) मंडलात तब्बल १७५ मिलिमीटर पाऊस झाला असून पाडळी मंडलातही १२१.३ मिमी इतका विक्रमी पाऊस झाला. यामुळे नदी-नाल्यांना पूर आला. पिकांचे प्रचंड नुकसान झाले. .बुलडाणा तालुक्यात सोमवारी (ता. २२) पहाटे जोरदार पाऊस झाला. पाडळी, गिरडा, मढ, गोंधनखेड, ईजलापूर व चौथा परिसरात ढगफुटीसदृश पावसामुळे शेतजमिनी, पिके व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानाची आमदार संजय गायकवाड यांनी सकाळीच पाहणी करीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून सरसकट मदत देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. .Pune Heavy Rain: पावसाचा जिल्ह्यात २७३ हेक्टरला फटका.या पाहणीवेळी बुलडाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे, मंडल अधिकारी सचिन चेके, उपकृषी अधिकारी धनंजय सोनुने, सहायक कृषी अधिकारी अनिल कण्हेर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. गिरडा-चौथा रस्त्यावरील वाहतूक बंद पडली होती. या पावसाने पैनगंगा, नळगंगा या दोन्ही नद्यांना पूर आला होता. येळगाव धरण भरल्याने पाण्याचा विसर्ग झाल्याने चिखली-बुलडाणा मार्ग बंद पडला होता. .Heavy Rain In Marathawada : मराठवाड्यात पावसाचा कहर; शेती पिकं गेली पाण्याखाली, तातडीने मदतीची अपेक्षा.सोयाबीन, मक्याची हानीया जोरदार पावसामुळे बुलडाणा तालुक्यात काढणीला आलेल्या सोयाबीन तसेच मका या पिकांची हानी झाली. पुराचे पाणी पिकातून वाहून शेंगा तुटून पडल्या. पीक जमीनदोस्त झाले. मक्याचे पीकही जमिनीवर आडवे पडले. सिंदखेडराजा तालुक्यातील सोनोशी मंडलातही सोयाबीन, मका, भाजीपाला, बीजोत्पादन क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली. .झालेला पाऊस पाडळी मंडल १२१.३ मिमी तुळजापूर ६५.८ सिंदखेडराजा ६५.८ सोनोशी १७५.३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.