Dharashiv News : उमरगा तालुक्यातील आलूर परिसरात सलग दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी (ता. १०) पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान, तसेच गुरुवारी (ता. ११) पहाटे आलूर शिवारात ढगफुटीसदृश धो धो पाऊस झाल्याने उडीद, सोयाबीन, तूर, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..सलग तीन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणी केलेल्या उडीद, सोयाबीनचे ढीग अक्षरशः पाण्यामध्ये वाहून गेले. शेतबंधारे फुटून अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. पावसाचे पाणी साचल्याने शेतशिवाराला तलावाचे स्वरूप आले आहे. .Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांसाठी ५७४ कोटींची मागणी .रस्ते वाहून गेले, तर आलूर बोळेगावमार्गे अक्कलकोटला जाणाऱ्या रस्त्यावर चार फुटांपर्यंत पाणी वाहत असल्याने हा मार्ग सकाळपासून बंद असल्याने वाहतूक सध्या पूर्णपणे बंद आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे उडीद, सोयाबीन या पिकांची अगोदरच वाढ खुंटली होती. आता जे थोड्याबहुत प्रमाणात पिके काढणीला आली होती. .त्यांचे सुद्धा संपूर्ण नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.आलूर येथील शरणप्पा काशेट्टी यांनी चार एकरांतील सोयाबीन काढून शेतामध्ये ठेवले होते. आज पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण चार एकरांवरील सोयाबीन पीक पाण्यात भिजून नुकसान झाले. .गावातील अशोक ब्याळिकुळ्ळे यांचे राहते घर पावसामुळे पडून संसारोपयोगी साहित्य भिजल्याने जवळपास दीड लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या शिवारातील कित्येक शेतकऱ्यांची पिके अक्षरशः पाण्यामध्ये वाहून गेली. .Rain Crop Damage : सातारा जिल्ह्यात पावसाने तीन कोटी २३ लाखांचे नुकसान.यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे उत्पन्न होणार नसल्याने शेतकरी हतबल झाला असून, प्रशासनाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून शंभर टक्के विमा मंजूर करावा, शासनाकडून अनुदान मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे..२०२४ च्या अनुदानातून मुरूम मंडळ वगळल्याने आलूर गावास या अगोदरच आर्थिक फटका बसला असून, यावर्षी तरी प्रशासन अनुदान व पीकविमा मिळवून देईल, या आशेने शेतकरी वाट पाहत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.