Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यात सोमवारी (ता.१५) दुपारी सिंदखेडराजा तालुक्यात काही ठिकाणी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरले असून, नद्यांनाही पूर आले आहेत. .दरम्यान धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्पाचे तब्बल १९ गेट मंगळवारी (ता.१६) उघडण्यात आले. नदीपात्रात मोठा विसर्ग केला जात आहे.जिल्हयात सोमवारी दुपारी व रात्री अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला..Buldhana Rain Delay: बुलडाणा जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत .या पावसाने सिंदखेडराजा तालुक्यात पळसखेड चक्का, उमरद, किनगाव राजा, सोनोशी, जांभोरा या आदी गावांत मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. सोयाबीन, कपाशी, मका यांसह नगदी पिके पाण्याखाली गेली असून, अनेक ठिकाणी १०० टक्के नुकसान झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत..Maharashtra Heavy Rain: राज्यात पावसामुळे खरिपाची दाणादाण.जांभोरा गावातील नानाभाऊ खरात यांची बैलजोडी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. यात एक बैल मृत्युमुखी पडला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, पंचनामे करून शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान मंगळवारी सकाळी पुन्हा पाऊस सुरु झाला. संग्रामपूर तालुक्यात या पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस आता फायदा कमी व नुकसानकारक अधिक होत आहे..पाऊस सोयाबीनसह इतर पिकांसाठी आता मारकसातत्याने होत असलेल्या पावसाने खरीप पिकांवर मोठे संकट उभे केले आहे. सतत पाऊस, ढगाळ वातावरणाने सोयाबीन, कपाशी, मका या पिकांवर जिल्हयात कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यातच जोरदार पावसाचे पाणी शेतात साचल्याने अनेक ठिकाणी पिके पाण्यात बुडाली होती..यामुळे पीक कुजण्याची, झाडांवर लागलेल्या शेंगा खराब होण्याची भीती निर्माण होत आहे. पिकांना स्वच्छ सूर्यप्रकाशाची सध्या नितांत आवश्यकता तयार झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लागवड झालेले सोयाबीनचे पीक लवकरच काढणीसाठी तयार होत असताना या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.