Ahilyanagar New: ‘‘रोग, किडीपेक्षा हवामानबदल अधिक घातक आहे. डाळिंब शेती हवामान बदलाने अति संवदेनशील झाली आहे. फूल निघणे, गळ, रोग या बाबींचा गुणवत्तेवर परिणाम होत आहे. जैविक, अजैविक बाबींपासून बागेचे संरक्षण करण्याची गरज आहे’’, असे मत द्राक्ष-डाळिंब तज्ज्ञ प्रमोद देशमुख यांनी व्यक्त केले. .‘सकाळ- अॅग्रोवन’ आणि रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने माही जळगाव (ता. कर्जत) येथे गुरूवारी (ता.२०) ‘बदलत्या हवामानानुसार डाळिंब बागेचे व्यवस्थापन व पाणी नियोजन’ या विषयावर चर्चासत्र झाले. द्राक्ष-डाळिंब तज्ज्ञ प्रमोद देशमुख यांनी यावेळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले..Pomegranate Management : डाळिंबासाठी मातीपाणी परीक्षण गरजेचे ः डॉ. विनय सुपे.रिवुलिस इरिगेशनचे वरिष्ठ कृषी सल्लागार शिवराज लोणाळे, रिवुलिस इरिगेशनचे जिल्हा व्यवस्थापक अमोल काजळे, विक्री अधिकारी अशोक लाढाने, सतीश आकडे, रिवुलिस इरिगेशनचे अधिकृत विक्रेते व त्रिमुर्ती एंटरप्रायजेसचे संचालक भाऊसाहेब सुरवसे, वसंत केसकर, सोपान जाधव, शिवाजी तापकीर, भगवान नवसारे, परमेश्वर निंबोरे, भगवान महारनवर, पॄथ्वीराज शेवाळे, महेश शेवाळे, सुभाष भवर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते..Fruit Crop Insurance : डाळिंबासाठी विमा योजना.देशमुख म्हणाले की, आपल्या डाळिंब बागेची परिस्थिती ओळखून वेळेत काम होणे गरजेचे आहे. सध्याचा काळ डाळिंब बागांच्या विश्रांतीचा काळ आहे. मात्र अनेक ठिकाणी अतिपावसाने पानगळती झालेली आहे. अशा ठिकाणी फुले निघताना दिसत आहेत. कोवळी फूट झाडांची विश्रांती मोडत असल्याने अशा बागांत जास्त काळ बहार धरण्याला उशीर करू नये. हवामान बदलाच्या काळात डाळिंबाच्या मुळाभोवती मल्चिंग उबदारपणा ठेवते..लोणाळे म्हणाले, ‘‘ठिबक ही दाबावर चालणारी आधुनिक सिंचन प्रणाली असून तिचा वापर करताना सर्वेक्षण व योग्य डिझाइन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रास्ताविक अॅग्रोवन’चे एक्झिक्युटिव्ह सचिन तवले यांनी केले. सूत्रसंचालन ‘अॅग्रोवन’चे सिनिअर एक्झिक्युटिव्ह सैफ शेख यांनी करून शिवाजी तापकीर यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.