Latur News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी (ता. २४) अतिवृष्टिग्रस्त भागात पाहणीसाठी उजनी (ता. औसा) येथे आले असता, त्यांचा संवाद सुरू असतानाच भरत कोळी या परिस्थितीने हतबल शेतकऱ्याने ‘ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी’वर बोलण्याची मागणी केली. .या वेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना ‘दादा, राजकारण करू नका’ अशी समज दिली. मात्र, मुख्यमंत्र्यांची पाठ वळताच पोलिसांनी कोळी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रसारमाध्यमांमुळे पोलिसांना त्यांना जागेवर सोडून द्यावे लागले..CM Devendra Fadnavis Solapur Visit : नुकसान भरपाईसाठी सरकार हात आखडता घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन .श्री. कोळी यांची उजनी येथे वडिलोपार्जित जमीन आहे. अतिवृष्टीने त्यांचेही पीक उद्ध्वस्त झाले. ते कुटुंबासह वास्तव्यास असलेल्या दुकानात पुराचे पाणी शिरले. पीक नुकसान व पुरानंतरच्या त्रासाचे त्यांना प्रचंड नैराश्य आले. या भागात दुपारी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी ओला दुष्काळ व कर्जमाफीवर बोला म्हणत आग्रह धरला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना ‘दादा, राजकारण करू नका’ म्हणून समज दिली..Ajit Pawar: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत .मुख्यमंत्री निघून गेल्यानंतर पोलिसांनी कोळी यांना ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा एक अधिकारी त्यांना पुढे नेत असताना पाहिल्यावर पत्रकारांनी कोळी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला व पोलिसांनाही जाब विचारला. त्यावर पोलिस उपनिरीक्षकांनी कोळी यांनी दारू प्राशन केली असून, वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले..कोळी यांनी माध्यमांना नुकसानीची व्यवस्थित माहिती दिली. आपली भूमिका कायम ठेवत काहीच चूक न केल्याचे सांगितले. शासनाकडून मिळणाऱ्या भरपाईवर प्रश्न उपस्थित केले. शेतकऱ्यांनीही कोळी यांची बाजू घेतली. पोलिस कारवाईला सामोरे जाण्याची तयारी त्यांनी दाखवली. यानंतर पोलिसांनी कोळी यांना तिथेच सोडून दिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.