Beed News: भारतीय ट्रेड युनियन केंद्राच्या (सीटू) वतीने गुरुवारी (ता. १२) देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात राज्यातील किसान सभा, शेतमजूर युनियन (लाल बावटा) संघटना तसेच विविध कामगार संघटना सहभागी होत असल्याची माहिती किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. ॲड. अजय बुरांडे यांनी दिली..श्री. बुरांडे म्हणाले, की कृषिप्रधान देशातील केंद्र सरकार साम्राज्यशाहीच्या दबावाखाली येत कोट्यवधी जनतेला अंधारात ठेवून भांडवली देशांसोबत गुप्त व्यापार करार करत आहे. सरकारच्या देशद्रोही स्वरूपाच्या कारभाराविरोधात शेतकरी, शेतमजूर आणि कामगार वर्ग एकत्रित झाला असून, केंद्र सरकारच्या सार्वभौमत्व, जनतेचे जीवनावश्यक हितसंबंध, धोरणात्मक स्वायत्तता आणि शेती व्यवस्था धोक्यात आणणाऱ्या शरणागतीविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे..Bhusar Traders Strike: व्यापाऱ्यांच्या बंदमुळे भुसार व्यापार ठप्प.भारत-अमेरिका नव्या व्यापारी करारानुसार अमेरिकेतील कृषी मालासाठी भारतीय बाजारपेठ खुली करून अमेरिकेसोबत सरकारने करार केला आहे. या कराराचा फटका देशातील कृषी व्यवस्थेला बसणार आहे. अमेरिकन मका, लाल ज्वारीपासून तयार केलेले इथेनॉल, भारतात बंदी असलेल्या जीएम सोयाबीनपासून तयार खाद्यतेल, सोयापेंड, पशुखाद्य, स्पिरिट, सुकामेवा, फळे, भाज्या व पोल्ट्री यांसाठी अमेरिकन मालास भारतीय बाजारपेठ खुली करून देण्यात आली आहे..देशात पिकविण्यात आलेल्या पिकांना हमीभाव न देता बी-बियाणे, खते यांसारख्या आवश्यक साहित्यांच्या दरवाढीमुळे आणि विदेशी अन्नधान्य आयात करण्याच्या धोरणामुळे शेती व शेतकरी पुन्हा उद्ध्वस्त होणार आहेत. पेट्रोलियम पदार्थांची मोठ्या प्रमाणात दरवाढ होऊन त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. शेती व दुग्ध व्यवसायाबाबत खोट्या व फसव्या घोषणा, रोजगार हमी योजनेतून सरकारची बाहेर पडण्याची भूमिका आणि कामगारविरोधी कायदे या पार्श्वभूमीवर ‘सीटू’ संघटनेने गुरुवारी देशव्यापी संप पुकारला आहे..Farmers Protest: बियाण्यांच्या गुलामगिरीविरुद्ध लढावेच लागेल.या संपात ठिकठिकाणी मोर्चे व निदर्शने करणार असल्याचे ॲड. बुरांडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विविध पदाधिकारी उपस्थित होते.....या आहेत मागण्याशेतकरीविरोधी करार रद्द करावा.कामगार संहिता रद्द करावी. मनरेगा योजना शेतकरी-शेतमजूर हिताची करावी.शेतीमालाला आधारभूत किंमत द्यावी.२०२५ चे वीज दुरुस्ती विधेयक रद्द करावे.सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना संरक्षण द्यावे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.