Navi Mumbai News: सानपाडा-पाम बीच मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येथे भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र या प्रकल्पासाठी रस्त्यालगत असलेला हिरवाईचा पट्टा मोठ्या प्रमाणावर बाधित होणार असून, तब्बल ४४० झाडांवर कुऱ्हाड चालणार आहे. यामध्ये काही झाडे तोडली जाणार असून, काही झाडे स्थलांतरित केली जाणार आहेत. याबाबतच्या नोटिसा थेट झाडांवर लावण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे..महापालिकेच्या वतीने पाम बीच मार्गाच्या कडेला विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून सुंदर हिरवाईचा पट्टा विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याचे सौंदर्य वाढले असून, पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागला आहे;.Wai Tree Cutting Protest : झाडे वाचली, सावली टिकली ; वाईकरांची एकजूटीचे फलित.मात्र आता भुयारी मार्गाच्या उभारणीसाठी येथील झाडे अडथळा ठरत असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. महापालिका वृक्ष प्राधिकरणाच्या प्रस्तावानुसार १११ झाडे तोडण्यात येणार असून, २३९ झाडे स्थलांतरित केली जाणार आहेत. या निर्णयाबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. .Tree Cutting: रानसोबती बनून कसं जगावं ?.नागरिकांनी आपल्या हरकती लेखी स्वरूपात महापालिका मुख्यालयात नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच झाडांवर पक्ष्यांची घरटी असल्यास त्याची माहितीही देण्यास सांगण्यात आले आहे..सानपाडा परिसरातील हा एकमेव मोठा हिरवा पट्टा असून, इतकी झाडे हटविल्यास परिसरात उष्णता वाढण्याची आणि प्रदूषण वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. आधीच वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त असताना झाडतोड झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होईल, अशी चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे हिरवा पट्टा वाचविण्याची आणि अधिक वृक्षलागवडीची मागणी जोर धरत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.