Dhule News : कुसुंबा (ता. धुळे) परिसरात वन विभागाने सोमवारी (ता. ८) सकाळी सिनेस्टाइल पाठलाग करून खैर लाकडाची तस्करी रोखली. या कारवाईत सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे..वनविभागाला एका ट्रकमधून खैर लाकडाची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ आणि त्यांच्या पथकाने साध्या वेशात महामार्गावर सापळा रचला. .संशयित ट्रक (जीजे-१५, एव्ही-६१७७) दिसताच त्याला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, चालकाने तो न थांबवता वेगाने पळ काढला. वनविभागाची जीप ट्रकच्या मागावर धावली. पाठलाग करताना ट्रकचालकाने सरकारी गाडीला धडक देण्याचा प्रयत्न केला. परंतु, अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत ट्रकला जवळून पकडले. अखेरीस, चालकाला ट्रक थांबवण्यास भाग पाडले..Bribe Arrest : लाकूड वाहून नेणारे वाहन सोडविण्यासाठी मागितली लाच.ट्रक थांबल्यानंतर चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव फरहान खान (वय २५, रा. वापी, गुजरात) असल्याचे सांगितले. त्याच्याकडून खैर लाकडाची तस्करी केल्याचे उघड झाले. ट्रकमधून खैर लाकडाचे ७३५ नग (एकूण ९.१६० घनमीटर लाकूड) जप्त करण्यात आले..Timber Transport : विनापरवाना लाकुड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई .जप्त केलेल्या लाकडाची बाजारातील किंमत सुमारे सात लाख रुपये असल्याचे प्राथमिक अंदाजाने स्पष्ट झाले आहे.या कारवाईत सरकारी मालमत्तेचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वनविभागाने दिला..ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यात वनपाल नितीन सांगळे, मुकेश सोचार, प्रकाश सोनार आणि इतर वनरक्षकांचा सहभाग होता. फरहान खान याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.