Chandrapur News : हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांचे चिंधीचक (ता. नागभीड) हे गाव. मात्र याच गावातील नागरिकांनी औदार्याचा परिचय देत अडचणीतील असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेत साडेबारा हजाराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत म्हणून दिली. .ग्रामस्थांनी आपल्या ऐपतीप्रमाणे ५०० ते ५० रुपयांचे योगदान याकार्यात दिले. नागभीड तालुका हा धान उत्पादनासाठी ओळखल जातो. एकाच पिकावर भिस्त असल्याने या भागात अपेक्षीत आर्थिक समृद्धी देखील नाही..Flood Relief : सिद्धेश्वर बाजार समिती पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत.मात्र त्यानंतरही मनाचा मोठेपणा जपत पावसामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चिंधीचक ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. गावातील बहुतांश नागरिकांचा व्यवसाय शेती आणि शेतमजुरी हाच आहे..Farmers Flood Relief: पूरग्रस्त शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी ‘स्नेहवन’ सरसावले .त्यामुळे आर्थिकस्थिती तशी योग्य नसली तरी अडचणीतील आपल्या शेतकरी बांधवांची मदत करायचीच या विचाराने झपाटलेल्या ग्रामस्थांनी आपल्या परीने लोकवर्गणी केली. त्यामध्ये कुणी ५००, २०० तर कुणी १००, ५० आणि २० रुपयांच्या माध्यमातूनही योगदान दिले..तहसीलदारांच्या केला सुपूर्दचिंधीचक ग्रामस्थांनी संकलित केलेली साडेबारा हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आली. उपसरपंच प्रदीप समर्थ यांनी तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्या सुपूर्द हा निधी केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.