Dharashiv News: यंदा मुबलक पाऊस झाल्याने आणि जमिनीत चांगला ओलावा असल्याने ज्वारी क्षेत्र घटून हरभरा क्षेत्रात दणदणीत वाढ होणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी दमदार पाऊस झाल्याने हरभरा जिल्ह्यातील प्रमुख रब्बी पीक ठरणार असून, ज्वारी दुसऱ्या स्थानावर राहणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने जाहीर केला आहे..कृषी विभागाकडून जिल्ह्यातील रब्बी हंगाम २०२५-२६ चे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार, सरासरी क्षेत्र, मागील वर्षीचे क्षेत्र आणि यंदाचे प्रस्तावित क्षेत्र जाहीर केले आहे. त्यानुसार यंदा हरभरा क्षेत्र सरासरीपेक्षा ३८ हजार ३०० हेक्टरने, तर मागील वर्षीपेक्षा तब्बल २४ हजार हेक्टरने वाढणार आहे. याशिवाय प्रमुख पीक असलेल्या ज्वारीच्या क्षेत्रात मात्र सरासरीच्या तुलनेत ४ हजार ५०० हेक्टरची वाढ कायम राहणार असली तरी मागील वर्षीपेक्षा हे क्षेत्र ४ हजार ७४१ हेक्टरनी घटण्याचा अंदाज आहे..Rabi Season: खरिपात हानी, आता रब्बीकडून अपेक्षा.जिल्ह्यात रब्बीचे एकूण सरासरी क्षेत्र ४ लाख २० हजार १३६ हेक्टर आहे. मागील वर्षीच्या रब्बी हंगामात सरासरीच्या तुलनेत ३४ हजार ५२५ हेक्टरने हे क्षेत्र वाढले होते. म्हणजेच ४ लाख ५४ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झाली होती. त्या क्षेत्रात यंदा आणखी ४ हजार ९४९ हेक्टरची वाढ अपेक्षित आहे. म्हणजेच चालू रब्बी हंगामात एकूण ४ लाख ५९ हजार ६१० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे..गहू, मका क्षेत्र सरासरीइतकेच म्हणजे अनुक्रमे २९ हजार हेक्टर, ६ हजार ८०० हेक्टर राहण्याचा अंदाज आहे. करडईचे क्षेत्रही जवळपास सरासरी गाठणार आहे. मात्र, जवस, सूर्यफूल क्षेत्र सरासरीच्या निम्मेच राहण्याची शक्यता आहे. रब्बीची पेरणी करताना शेतकऱ्यांनी बियाणे प्रक्रिया करूनच पेरणी करावी. .Rabi Season: बुलडाणा जिल्ह्यात रब्बीत हरभरा, मका क्षेत्रांत होणार वाढ.रब्बी क्षेत्र स्थिती (हेक्टर)पीक सरासरी क्षेत्र २०२४-२५ २०२५-२६हरभरा २११७०० २२६०५५ २५००००ज्वारी १६३५०० १७२७४१ १६८०००गहू २९००० २७११८ २९०००मका ६८०० ६७२३ ६८००.करडई ४८०० ५३५९ ४६००जवस ५०० २४० २४०सूर्यफूल ५०० ६७ ७०इ.गळीत धान्य ९०१ १९९ ३००इतर तृणधान्य ८५२ १२८४ ३००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.