Rabi Crop Management: रब्बी हंगामातील हरभरा हे महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. राज्यात या पिकाच्या क्षेत्रामध्ये भरघोस वाढ झाली आहे. हरभरा पिकासाठी पूर्व मशागत, योग्य जमिनीची निवड, खतमात्रा, पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास हरभरा पिकाच्या उत्पादनात वाढ होते आणि नफाही मिळतो. या लेखासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठाने मार्गदर्शन केले आहे. .जमीनहरभरा पिकासाठी काळी कसदार व चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी तसेच ती जमीन मध्यम ते भारी प्रकारची असावी. हलकी किंवा भरड, पाणथळ, चोपण किंवा क्षारयुक्त जमीन लागवडीसाठी निवडू नये तसेच जमिनीचा सामु ६.५ ते ७.५ या दरम्यान असावा व सेंद्रिय कर्ब ०.५ पेक्षा जास्त असावा. .Chickpea Varieties: हरभऱ्याचे सर्वोत्तम ६ सुधारित वाण, काय आहेत त्यांची वैशिष्ट्ये?.पूर्वमशागतखरीपाचे पीक निघाल्यानंतर खोलगट नांगरणी करावी. यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. पीक काढल्यानंतर काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. अन्यथा जमिनीद्वारे होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. हरभऱ्यासाठी जमिनीची पूर्व मशागत करताना सिंचनाच्या सोईसाठी जमिनीच्या उतारानुसार सारा यंत्राने वरंबे आणि रिजरने दांड तयार करुन रान बांधणी करावी. तसेच मशागत करताना सरी वरंबे नेहमीपेक्षा जास्त रुंद ठेवून पेरणी करावी..पेरणीची वेळतज्ज्ञांच्या शिफारशीप्रमाणे कोरडवाहू जमिनीची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात करावी. तर बागायतीसाठी ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करु शकतो. कोरडवाहू शेतीमध्ये ३० बाय १० सें.मी. अंतराने तर बागायती जमिनीसाठी ४५ बाय १० सें.मी. अंतराने म्हणजेच दीड फुटाने पेरणी करावी. .खतमात्रा हरभरा पिकासाठी मातीपरीक्षण करुनच खतमात्रा द्यावी. हरभऱ्यासाठी शेणखत आणि कंपोस्टची जोड असेल तरच रासायनिक खतांचा कार्यक्षमतेने वापर होतो. यासाठी शेणखत किंवा कंपोस्ट एकरी ५ ते १० टन किंवा १२ ते १५ बैलगाडी वापरावे. हरभऱ्याला एकरी १० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि १२ किलो पालाशची गरज असते. .हे खत तीन प्रकारात देता येते. प्रती एकरासाठी पहिला पर्याय म्हणजे डीएपी ५० किलो अधिक एमओपी २० किलो किंवा दुसरा पर्याय म्हणजे युरिया २० किलो, एसएसपी १२५ किलो किंवा एमओपी २० किलो किंवा तिसरा पर्याय म्हणजे १२:३२:१६ हे खत ७५ किलो अधिक युरिया ६.५ किलो यांचा वापर करावा. यासोबतच सुक्ष्मअन्नद्रव्ये सुद्धा पिकाला द्यावीत. यामध्ये गंधक ८ किलो आणि झिंक सल्फेट ६ किलो प्रति हेक्टरी वापर करावा..विद्राव्य खतांचे प्रमाणपेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसायला लागल्यास, पिकाची पाने पिवळी किंवा कडेने जांभळी पडायला लागल्यास मल्टीमायक्रोन्युट्रीयंट ग्रेड २ हे खत ०.५% म्हणजेच १० लिटर पाण्यात ५० मिलि टाकून फवारावे.फुलोरा अवस्थेत युरिया (१.५%) + मल्टीमायक्रोन्युट्रीयंट ग्रेड २ (०.५%) हे खत १५० ग्रॅम युरिया + ५० ग्रॅम मल्टीमायक्रो न्युट्रीयंट ग्रेड २ प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तर घाटे भरण्याच्या अवस्थेत ००:५२:३४ हे खत (०.५%) ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. परंतु पिकाची वाढ योग्य पद्धतीने होत असल्यास विद्राव्य खतांची फार आवश्यकता नसते..आंतरमशागत जोमदार वाढीसाठी पीक सुरुवातीपासूनच तण विरहीत ठेवावे. पीक २० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणीमुळे जमिनीत हवासुद्धा चांगली खेळती राहते. आणि पिकाची वाढ चांगली जोमाने होते. कोळपणीनंतर एक खुरपणी करावी. कोरडवाहू क्षेत्रामध्ये कोळपणीमुळे जमिनीत पडत असलेल्या भेगा बुजून ओल टिकून राहते. तसेच पेरणी अगोदर शेतात तणांचा जास्त प्रादुर्भाव असल्यास पेरणीपूर्वी पेन्डामेथिलिन हे तणनाशक २.५ लिटर प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. हे तणनाशक जमिनीत ओलावा असताना फवारल्यावरच त्याचा प्रभाव दिसतो..पाणी व्यवस्थापनजिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन सऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा, तसेच लांबी सुध्दा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीस पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात. .त्यासाठी पहिले पाणी ३० ते ३५ दिवसांनी द्यावे तर दुसरे पाणी ४५ ते ५० दिवसांनी द्यावे. यानंतर ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीत पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा असतात. त्यासाठी पहिले पाणी ३० ते ३५ दिवसांनी व दुसरे पाणी ६५ ते ७० दिवसांनी द्यावे.हरभऱ्याच्या पिकाला जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार आणि जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यामध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याच्या आतच पिकास पाणी द्यावे.पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. नाहीतर पिकाला मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते..हरभरा पिकासाठी तुषार सिंचनाचा वापरतुषार सिंचनामुळे पिकाला हवे तेव्हा गरजेपुरता पाणी देता येते. सारा, पाट- वरंबा यासारख्या पद्धतीने पाणी दिल्यास जमीन दाबून बसते व जमिनीचा भुसभुशीतपणा कमी होतो आणि त्याचा उत्पादनावर परिणाम होतो.परंतु तुषार सिंचनाने जमीन नेहमी भुसभुशीत राहते. अगोदन तुषार सिंचनाने जमीन ओलावून मशागत केली आणि तिफन किंवा पाभरीच्या सहाय्याने काकऱ्या पाडून हरभरा बियाणे टोकण केले तर पिकाची उगवण अतिशय चांगली होते.तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास शेतामध्ये सारा, पाटा- वरंबा पाडण्याची गरज नसते. पर्यायाने खर्चात बचत होते. तसेच तणांचा प्रादुर्भावसुद्धा कमी होतो.तुषार सिंचन पद्धतीमध्ये जमिनीत नेहमीच वाफसा स्थिती राहत असल्यामुळे पिकास दिलेली सर्व खते पूर्णपणे उपलब्ध होतात आणि वाफसा स्थितीमुळे पिकाची अन्नद्रव्ये शोषण्याची क्षमता वाढते. त्यामुळे तुषार सिंचन हरभरा पिकासाठी फायदेशीर ठरते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.