Chana Cultivation: कमी पाण्यावर हरभरा लागवड यशस्वी करण्यासाठी पाण्याचा कार्यक्षम वापर, योग्य पेरणी पद्धत आणि अचूक खत व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास पिकाला पहिले पाणी फुले येण्याच्या किंवा कळीच्या अवस्थेत आणि दुसरे पाणी घाटे भरतेवेळी द्यावे. अत्यंत कमी पाणी असल्यास फक्त घाटे भरतेवेळी एक सुयोग्य ओलीत देणे फायद्याचे ठरते, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला..रुंद वरंबा सरी पद्धतीचा वापर केल्यास पाण्याची ३० टक्क्यांपर्यंत बचत होते आणि उत्पादनात वाढ होते. हरभरा लागवडीसाठी जमीन ओलवून पेरणी करावी, असे आवाहन डॉ. डी. के. पाटील यांनी केले. ते कृषी विज्ञान मंडळाच्या ३५० व्या मासिक चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शन करताना बोलत होते..Chana Farming: घाटे अळी नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापनावर भर.कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना येथे कृषी विज्ञान मंडळाच्या ३५० व्या मासिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास कृषी संशोधन केंद्र, बदनापूर येथील प्रभारी अधिकारी डॉ. डी. के. पाटील, ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील प्रभारी अधिकारी डॉ. अंबिका मोरे, प्रादेशिक रेशीम कार्यालय, छत्रपती संभाजीनगरचे उपसंचालक एम. बी. ढवळे आणि कृषी विज्ञान केंद्र, खरपुडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांची प्रमुख उपस्थिती होती..रब्बी ज्वारी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. मोरे म्हणाल्या, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी विकसित केलेले परभणी मोती, परभणी सुपर मोती, परभणी ज्योती, सुपर दगडी अशा विकसित वाणांची पेरणीसाठी निवड करावी. पेरणी करताना जमिनीतील ओल कमी होणार नाही, याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी आणि शक्य झाल्यास ज्वारी पेरणीनंतर पाणी द्यावे..Chana Farming: सुधारित पेरणी तंत्रासोबत खत, पाणी व्यवस्थापनावर भर.डॉ. ढवळे म्हणाले, रेशीम शेती ही दुष्काळातही शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देऊ शकते. तुती हे कमी पाण्यावर येणारे पीक आहे. हवामान बदलावर मात करताना शेतकऱ्यांनी रेशीम आधारित एकात्मिक शेती पद्धतीच्या मॉडेलचा अवलंब करावा, असे ते म्हणाले..प्रास्ताविक डॉ. सोनुने यांनी केले. ते म्हणाले, सध्या हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ससूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे मृदाशास्त्रज्ञ प्रा. राहुल चौधरी यांनी केले, तर आभार कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान तज्ज्ञ डॉ. संगीता कऱ्हाळे यांनी मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.