Crop Damage: शेतातील हरभरा पिकाला आग लावून शेतकऱ्याचे नुकसान करणाऱ्या दोन संशयितांना अटक करण्यात सेलू पोलिसांना यश आले आहे. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे..वर्धा तालुक्यातील शेतकरी गजानन कांबळे यांच्या मुरिदपूर शिवारातील पाच एकर शेतात हरभरा पिकाची लागवड करण्यात आली होती. २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञातांनी या शेतातील हरभऱ्याला आग लावली. या आगीत मोठ्या प्रमाणावर उभे पीक जळून खाक झाले. घटनेनंतर कांबळे यांनी सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती..Sugarcane Fire: शामगावात १०८ गुंठ्यांतील ऊस आगीमध्ये जळून खाक.तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. राहुल रमेश श्रीखंडे (वय ३४, रा. कोपरा) आणि मंगेश रामदास भुजाडे (वय ३४, रा. कोपरा, ता. सेलू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. .Wheat Farm Fire: शॉर्टसर्किटमुळे कापणीवर आलेला गहू जळून खाक.पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, .अपर पोलिस अधीक्षक सतवेश वाघमारे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकूर, उपनिरीक्षक त्रिभुवन निमगडे, विक्रम काळमेघ आणि रामकृष्ण इप्पर यांनी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.