Chicken Prices Jump Tamil Nadu: ब्रॉयलर कंपन्यांनी निश्चित केलेला कोंबडी खरेदी दर कमी असल्याचे सांगत तामिळनाडूतील पोल्ट्री उत्पादक शेतकरी संपावर (Poultry Farmers Protest) गेले आहेत. यामुळे ब्रॉयलर कोंबड्यांचा पुरवठा कमी झाला आहे. परिणामी, ब्रॉयलर चिकनचा दर किरकोळ बाजारात काही ठिकाणी ४० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सध्या चिकनचा दर प्रति किलो ३६० रुपयांवर असून, डिसेंबरमध्ये तो दर २६० रुपये होता..येथील शेतकऱ्यांनी खरेदी दर वाढण्याची मागणी करत पोल्ट्री उत्पादन थांबवले आहे. यामुळे जिवंत पक्ष्यांचा पोल्ट्रीतील दर (Farm Gate Price) प्रति किलो १५२ रुपयांवर पोहोचला आहे. जानेवारीच्या सुरुवातीला हा दर प्रति किलो १३० रुपये होता. नोव्हेंबर महिन्यात हा दर १०० रुपयांच्या खाली होता..तामिळनाडूमध्ये सुमारे १९ हजार पोल्ट्री उत्पादक शेतकरी आहेत. यातील तामिलगा विवसायीगल पथुकप्पू संगम या संघटनेशी जोडलेले शेतकरी कोंबडी खरेदी दरात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी १ जानेवारीपासून संपावर गेले आहेत. यामुळे पुरवठा कमी झाल्याने किरकोळ दरात मोठी वाढ झाली असल्याचे चिकन विक्रेते सांगतात..Chicken Price Rise: मांसल कोंबडी बाजारात जोरदार तेजी.यावर तोडगा काढण्यासाठी २१ जानेवारी रोजी सरकार, पोल्ट्री उत्पादक शेतकरी आणि ब्रॉयलर कंपन्या यांच्यात चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीत एक किलो ब्रॉयलर चिकन उत्पादनासाठी १०० रुपयांपर्यंत खर्च येतो, असे ब्रॉयलर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. .Desi Chicken Breeds: सुधारित देशी कोंबड्यांच्या जातींची वैशिष्ट्ये.अधिक मिळालेल्या माहितीनुसार, येथील ब्रॉयलर कंपन्या शेतकऱ्यांना ब्रॉयलर पक्षी पालनासाठी प्रति किलो ६.५ रुपये, फार्ममध्ये पाळलेल्या गावठी पक्षी पालनासाठी प्रति किलो १५ रुपये आणि बटेर पालनासाठी ३ रुपये देत असल्याचे सांगण्यात आले. तर शेतकरी कंपन्यांकडे ब्रॉयलर कोंबडीसाठी प्रति किलो २० रुपये, फार्ममधील गावठी कोंबडीसाठी प्रति किलो २५ रुपये आणि बटेर पालनासाठी प्रति किलो ७ रुपये दर वाढवून देण्याची मागणी करत आहेत..दरम्यान, या प्रकरणी ब्रॉयलर कंपन्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तामिलगा विवसायीगल पथुकप्पू संगमचे संस्थापक ईसन मुरुगसामी आणि इतर ९ पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांवर अटकेची कारवाई केली होती. त्यांच्या तत्काळ सुटकेची मागणी करत, २० शेतकऱ्यांनी रविवारी तिरुपूरमध्ये बेमुदत उपोषण केले. पण, पोलिसांनी सोमवारी सकाळी त्यांना ताब्यात घेतले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.