Washim News: मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवारी (ता. ५) वाशीम शेतीशिल्प अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या चिया तिळगूळ, चिया चिक्की, चिया न्यूट्री बार या नावीन्यपूर्ण व पौष्टिक उत्पादनांचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले..या वेळी आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, उद्योग सहसंचालक नीलेश निकम, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक पूनम घुले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते..Makar Sankranti Outfit : यंदाच्या मकर संक्रांतीला काळ्या साडीवर घाला 'या' रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज.परंपरेने मकर संक्रांतीला तीळ-गूळ खाण्याची प्रथा आहे. या पारंपरिक पदार्थांमध्ये आरोग्यदायी चियापासून हे पौष्टिक पदार्थ विकसित करण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे पोषणमूल्य वाढण्यासोबतच शेतकरी व महिला बचत गटांना उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध झाले आहे..Makar Sankranti : चाळीस महिलांनी तीन दिवसांत बनवले ३२ हजार तीळ लाडू.आत्मा प्रकल्पांतर्गत बेंगळुरू येथे चिया न्यूट्री बार निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्या प्रशिक्षणाच्या आधारे शेतकरी व महिला बचत गटांनी या चिया आधारित पदार्थांची निर्मिती केली आहे..चिया तिळगूळ महोत्सववाशीम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दोन दिवसीय ता. १३ ते १४ जानेवारी रोजी ‘चिया तिळगूळ महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला भेट देऊन चिया आधारित उत्पादनांना प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.