Agriculture Market: अकोला येथील स्थानिक कृषी बाजार समितीमध्ये ३० एप्रिलपासून चिया सीड खरेदी-विक्रीला सुरुवात झाली असून, पहिल्या बाजाराचा लिलाव मुहूर्त सभापती शिरीष धोत्रे यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी शेतकऱ्यांनी विक्रेत्यांकडे चिया सीड विक्रीला आणले होते..अकोला जिल्ह्यात व परिसरात चिया सीड उत्पादकतेकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. स्थानिक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी सुरू करण्यात आली. .Seed Production: खरिप पीकांचे एक लाख १५ क्विंटलवर बियाणे उत्पादन.पहिल्याच दिवशी अजय मनोहरराव ठोकळ, नाना वाघमारे, विजय चव्हाण, अशोक नकते, धीरज चवरे, संजय शिंदे, महादेव आवारे, किशोर जाधव, शकीलभाई, अमोल जाधव, जगन्नाथ राऊत या शेतकऱ्यांनी चिया सीड विक्रीला आणले होते. या शेतीमालास १५,००० ते २०,१०० रुपयांदरम्यान दर मिळाला. चिया सीड विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार सभापती धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला..Cash Crop: डहाणूमध्ये नगदी पिकांकडे कल.या प्रसंगी बाजार समितीचे व्यापारी प्रतिनिधी सदस्य राजीव शर्मा, अडते व्यापारी जितेंद्र थोरात, श्री. समुद्रे, महेश मुंदडा, अतुल जैन, अरुण अग्रवाल, संदीप चौखंडे, प्रशांत देशमुख, बाजार समिती सचिव सुनील मालोकार, कर्मचारी सागर काळे, .विशाल चोपडे, किशोर गाडगे यांच्यासह बाजार समितीमधील अडते खरेदीदार, कामगार व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.स्थानिक बाजार समितीत शेतकऱ्यांनी चिया सीड विक्रीसाठी आणावे. सोमवार व गुरुवारला खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.