Jalna News : बदलत्या हवामानात शेतकऱ्यांनी आरोग्यदायी चिया पिकाची लागवड करून आर्थिक स्थैर्य साधावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे बारामती येथील अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. हरिशा सी. बी. यांनी केले..खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे आयोजित कृषी विज्ञान मंडळाच्या ३३७ व्या मासिक चर्चासत्रात ‘चिया उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर तज्ज्ञ म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त कृषिभूषण भगवानराव काळे यांची उपस्थिती होती. .ज्वारी पिकावर मार्गदर्शन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. लक्ष्मण जावळे, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती येथील दुसरे शास्त्रज्ञ डॉ. बस्वराज पी. एस. आणि कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. हरिशा म्हणाले, की पिकांच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी सुपीक जमीन आवश्यक आहे. .Chia Seed Farming : करडई, चियासीडमधील ‘योगऋषी’.पेरणीसाठी बियाण्यास बुरशीनाशकाची कोरडी प्रक्रिया करावी. चियाची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत करावी. लागवडीनंतर पहिले पाणी पेरणीनंतर लगेच द्यावे आणि दुसरे साधारणतः पेरणीनंतर सहा दिवसांनी द्यावे. तिसऱ्या सिंचनानंतर पुढील पंधरा दिवस पाणी देणे थांबवावे जेणेकरून मुळे खोल जातील आणि पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढेल. चिया पिकामध्ये मेथी, कोथिंबीर, शेपू असे पालेभाज्या वर्गीय पिके आंतरपीक म्हणून घेता येतात. .पिकाच्या वाढीच्या कालावधीत बिहारी केसाळ अळी आणि मावा यांसारख्या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. चियाची काढणी केल्यानंतर ट्रॅक्टरचलित मळणी यंत्राद्वारे मळणी करावी. डॉ. बस्वराज यांनी चियाच्या नवीन जातींवर सुरू असलेल्या संशोधनाबाबत माहिती दिली. ‘रब्बी ज्वारी उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ. जावळे म्हणाले, की मराठवाड्यात रब्बी ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. .Chia Farming: थेट विक्री पर्यायातून वाढविले नफ्याचे मार्जीन .शेतकऱ्यांनी परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या परभणी मोती, परभणी सुपर मोती, परभणी सुपर दगडी व हुरड्यासाठी परभणी वसंत यासारख्या सुधारित वाणांचा वापर करावा. अध्यक्षीय समारोप करतांना कृषिभूषण श्री. काळे म्हणाले, की शेतकऱ्यांनी काळानुरूप बदलले पाहिजे. .कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील नैसर्गिक शेती प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कृषी सखींना प्रमानपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मृदशास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.