Washim News : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी बुधवारी (ता.१७) दूरदृष्यप्रणालीद्वारे केला. .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद सदस्य आ. किरणराव सरनाईक होते. यावेळी आ. सईताई डाहाके (दूरदृष्यप्रणालीद्वारे), जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, उपजिल्हाधिकारी वीरेंद्र जाधव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिल्पा सानप आदी मान्यवर उपस्थित होते..Aadhaar Seva Kendra: बुलडाणा जिल्ह्यात ४५ नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना.पालकमंत्री भरणे म्हणाले,‘‘सेवा पंधरवड्यातून शासनाच्या सेवांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत लाभ मिळवून देण्याकरिता आपण सर्व प्रयत्न करूयात.’’.जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी महाराजस्व अभियान, पाणंद रस्त्यांची नोंद, ग्रामसभांचे आयोजन, गावभेटी व सेतू जनसंवाद उपक्रम याबाबत माहिती दिली. रविवार (ता.२८) ते २ ऑक्टोबरदरम्यान ५० गावांत सनद वाटप शिबिरे आयोजित केली जाणार आहे. .Krishi Seva Kendra : आठ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित.कार्यक्रमात संजय गांधी योजना, आधार व ओळखपत्र, उत्पन्न व जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, घरकुल पट्टे, सातबारा फेरफार, भूसंपादन मोबदला, स्वामित्व सनद आदी विविध प्रमाणपत्रांचे प्रतीकात्मक वाटप करण्यात आले..प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अर्चना घोळवे व शाहू भगत यांनी केले. उपजिल्हाधिकारी श्री. जाधव यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.