Election Scrutiny: ५-छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-२०२६ साठी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवारी (ता. ७) करण्यात आली. छाननीअंती ५४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत..निवडणूक कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या वैध उमेदवारांच्या यादीत अनुक्रमांक १ ते ५४ अशा एकूण ५४ उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे..Chhatrapati Sambhajinagar Mayor Election: महानगरपालिकेच्या महापौरपदी समीर राजूरकर.५-छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-२०२६ साठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. ६) दुपारी तीन वाजेपर्यंत ५१ नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली होती. त्यापूर्वी ४१ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. त्यामुळे मंगळवारी प्राप्त झालेल्या ५१ नामनिर्देशनपत्रांची भर पडून निवडणूक कार्यालयाकडे एकूण ९२ नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली..या नामनिर्देशनपत्रांद्वारे एकूण ६२ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली होती. काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक नामनिर्देशनपत्रे दाखल केल्यामुळे नामनिर्देशनपत्रांची संख्या ९२, तर उमेदवारांची संख्या ६२ होती..Local Body Elections: जळगाव जिल्हा परिषद, पंचायतींच्या निवडणुकीपूर्वी इनकमिंग-आउटगोइंग.शुक्रवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोण बंडखोरी करतो आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात कोणते उमेदवार राहतात, हे स्पष्ट होणार आहे..२३ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.