Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण करिता २०२६-२७ मध्ये वित्तीय मर्यादा ५२६ कोटी ८३ लक्ष रुपये इतकी होती. यंत्रणांनी प्रत्यक्षात २०३१ कोटी ९७ लक्ष रुपयांची मागणी केली असून, १५०० कोटी रुपयांचा प्रस्तावित आराखडा आहे. २०२५-२६ च्या तुलनेत २०२६-२७ साठी ७६५ कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्यात आली. त्यास समितीची मान्यता देण्यात आली..जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी (ता. 12) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली.या बैठकीस इमाव, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, विधान परिषद सदस्य आ. संजय केणेकर, विधान सभा सदस्य आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, आ. प्रशांत बंब, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजना जाधव, आ. विलास भुमरे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. .District Annual Plan: बुलडाण्यात वाढीव निधीसाठी प्रयत्नशील .पालक सचिव हर्षदीप कांबळे हे दूरदृश्य प्रणालीने सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी दिवंगत अजितदादा पवार यांचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या जिल्ह्यातील भेटीवर आधारित जिल्हा माहिती कार्यालयाने केलेली चित्रफीत दाखवून व दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. .District Annual Plan : प्राप्त निधीच्या खर्चाची टक्केवारी केवळ ३४ टक्के.२०२५-२६ मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणकरिता ७३५ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजना करिता १०४ कोटी रुपये, तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना १० कोटी ४६ लक्ष रुपये असा एकूण ८४९ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. सादरीकरण जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. सूत्रसंचालन भारत वायाळ यांनी केले. लोकप्रतिधींच्या मागण्या आ. प्रशांत बंब यांनी शालेय शिक्षणाचा खालावत चाललेला दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने केलेल्या प्रयत्नांचा अहवाल मागणी केली होती. .समिती समोर सादर झालेला अहवाल हा वस्तुनिष्ठ नसल्याने शिक्षणाधिकारी यांनी प्रस्तावित केलेल्या कारवाईसह अहवाल सादर करावा. त्यासाठी वाढीव मुदत द्यावी, असे सांगितले. आ. रमेश बोरनारे यांनी ग्रामिण भागात विद्युत रोहित्रे निकामी होण्याचे प्रमाण वाढत चालले असून, त्यासाठी जादा निधी द्यावा अशी मागणी केली. आ. भुमरे यांनी क्षेत्रनिहाय प्राप्त रोहित्र व त्याचे वितरण याचा अहवाल वीज वितरण कंपनीने सादर करावा, अशी मागणी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.