Pune News: भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने १६ व्या दिवशी १ लाख टन ऊस गाळपाचा टप्पा गाठला असून ८८ हजार ९०० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे..श्री छत्रपती कारखान्याच्या गळीत हंगामास १ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. कारखान्याने १६ दिवशी रविवारी (ता.१६) १ लाख टन ऊस गाळपाचा टप्पा गाठला आहे. १ लाख ४ हजार ८९१ टन गाळप पूर्ण झाले. तसेच ८८ हजार ९०० क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. रविवारी साखरेचा उतारा (रिकव्हरी) १०.१६ असून सरासरी उतारा ९.३४ झाला आहे. कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून आत्तापर्यंत २७ लाख ९ हजार युनिट विजेची महावितरणला निर्यात केली आहे..Sugarcane Price Issue: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी घेतली PM मोदींची भेट; ऊसदराबाबत केली महत्त्वाची मागणी.चालू गळीत हंगामापूर्वी कारखान्याच्या ओव्हरऑइलिंग व दुरुस्तीचे कामे चांगल्या दर्जाची झाल्यामुळे कारखाना क्षमतेपेक्षा अधिक गाळप करीत आहे. कारखान्याच्या दोन्ही युनिटची गाळप क्षमता ६५०० टन आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कारखाना ८ हजार टनापेक्षा अधिक गाळप करीत आहे. रविवारी एका दिवसामध्ये ८२०४ टन उसाचे गाळप झाले..Sugarcane Crushing Season: ‘द्वारकाधीश’चे ६ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट.शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाहीछत्रपती कारखान्याने खोडव्या उसाला १०० रुपये प्रतिटन व पूर्व हंगामी व सुरू उसास ७५ रुपये प्रतिटन अनुदान जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप उशिरा झाल्यास तोटा होणार नाही. संचालक मंडळ शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याने जाचक व गावडे यांनी सांगितले..१२ लाख टन गाळपासाठी प्रयत्न करूकारखान्याचे सभासद,कामगारांनी संचालक मंडळावर विश्वास ठेवून काम करीत आहेत. शेतकरी विश्वासाने कारखान्याने ऊस देत आहेत. सर्वांच्या विश्वासामुळे १ लाख टन ऊस गाळपाचा टप्पा यशस्वी पूर्ण झाला असून सर्वांनी एकजुटीने काम करून १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करून कारखान्याला अडचणींमधून बाहेर काढू, असे कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.