Walchandnagar News: भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाची पहिली उचल ३१०१ रुपये प्रति टन जाहीर केली आहे. कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी उचल ठरली आहे. शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलातून कसलीही कपात न करता १० डिसेंबर रोजी गाळप झालेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली..कारखान्याच्या पहिल्या हप्त्याकडे इंदापूर, बारामतीसह जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांचे लक्ष लागले होते. कारखान्याच्या संचालक मंडळाने सोमवारी (ता.१) चालू गाळप हंगामातील उसाचा पहिला हप्ता जाहीर केला. यावेळी अध्यक्ष जाचक व उपाध्यक्ष गावडे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे संचालक मंडळ पारदर्शक कारभार पाहत आहे..Bidri Sugar Factory: 'बिद्री'कडून प्रतिटन ३,६१४ रुपये दराने ऊसबिले जमा, साखर उतारा १०.८५ टक्के .कारखाना सभासद व गेटकेनधारकाच्या उसाला समान भाव देण्यात येणार आहे. उशिरा तुटणाऱ्या खोडवा उसाला पहिला हप्ता ३२०१ रुपये व सुरू व पूर्वहंगामी उसाला ३१७६ रुपये मिळणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या साखरेच्या उताऱ्यामध्ये सरासरी एक टक्क्याने वाढ झाल्यामुळे २०२६ च्या दिवाळीला देखील शेतकऱ्यांना चांगले पैसे देता येतील.कारखान्यामध्ये ओव्हर हॉलिंगची व दुरुस्ती कामे चांगली केल्यामुळे सातत्याने आठ हजार टनांपेक्षा अधिक गाळप होत आहे. कारखान्याच्या विस्तार वाढीनंतर आठ हजारांच्या पुढे गाळप होणारे हे पहिलेच वर्ष आहे. गतवर्षीच्या तुलनेत उसाचे १.५ लाख टनापेक्षा अधिक गाळप झाले आहे..Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याकडून ३३०० रुपये प्रति टन पहिली उचल.संचालक मंडळाने यापूर्वी ‘माझा कारखाना, माझी जबाबदारी, वजन चोख, पैसे रोख. ऊस छत्रपतीला देऊ बिनधोक’ अशी टॅगलाइन केली होती. आता संचालक मंडळाने ‘वेळेत धन हजार किलोचा टन’ ही नवीन टॅग लाइन करून कारखान्याचा वजन काटा शंभर टक्के अचूक असल्याचे छातीठोकपणे दावा केला आहे. या वेळी संचालक शिवाजी निंबाळकर, अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, पृथ्वीराज घोलप आदी पदाधिकारी उपस्थित होते..२ लाख १२ हजार ६०० क्विंटल साखरेचे उत्पादनछत्रपती साखर कारखान्याने रविवारपर्यंत (ता.३०) कारखान्याने ३० दिवसांत २ लाख १६ हजार ५०३ टन उसाचे गाळप केले आहे. दोन लाख १२ हजार ६०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखरेचा उतारा १०.२२ टक्के व रविवारचा उतारा ११.०९ टक्के आहे. कारखान्याने सहवीज निर्मिती प्रकल्पातून ६४ लाख ८८ हजार युनिट वीज महावितरणाला निर्यात केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.