OBC Reservation Conflict: लातूरमध्ये तरुणाच्या आत्महत्तेनंतर, भुजबळ-मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
Maharashtra Politics: लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात ओबीसी आरक्षण धोक्यात असल्याच्या भीतीने भरत महादेव कराड यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर सामाजिक तणाव निर्माण झाला असून, नेत्यांनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे.