Buldana News: रब्बी हंगामात लागवड झालेल्या पिकांना सिंचन सुरळीत व्हावे आणि शेतकऱ्यांच्या जीविताला होणारा धोका टाळावा यासाठी शेत शिवारातील विहिरीवरील वीज भारनियमनाच्या वेळापत्रकात तातडीने बदल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी दसरखेड येथील महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंत्यांकडे केली आहे. .या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, दसरखेड महावितरण कार्यालयाच्या ग्रामीण कार्यक्षेत्रात गहू, हरभरा, मका यासारखी रब्बी पिके मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली आली आहेत. .MSEDCL TOD Meter : दीड लाख ग्राहकांना मिळाली २४ लाखांची सवलत.शेतकऱ्यांनी सिंचनाची व्यवस्था केली तरी १६ तासांच्या प्रदीर्घ भारनियमनाने संपूर्ण सिंचन नियोजन विस्कळीत होत आहे..MSEDCL SMS Service : तेरा लाखांवर ग्राहकांना वीजसेवेची माहिती मिळते ‘एसएमएस’वर.त्यातच २१ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आलेल्या पहाटे ५ ते दुपारी १ या वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकाने शेतकऱ्यांची अडचण आणखीच वाढवली आहे. पहाटेच्या अंधारात, कडाक्याच्या थंडीत पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाणे हा शेतकऱ्यांसाठी जीवावरचा प्रसंग ठरत आहे. .विहिरींच्या परिसरात साप-विंचूसारख्या सरपटणाऱ्या जिवांचा धोका कायम असतो. त्यात थंडी शेतकऱ्यांच्या संघर्षात भर घालत आहेत. या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणे सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेतच वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.