Nashik News : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य व उपबाजार आवारांचा सुधारित विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे प्रस्तावित आहे.तसेच शेतीमाल आवकेत वाढ होईल, यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सभापती नितीन आहेर यांनी सांगितले. यासह बाजार समितीस भविष्यात करावयाच्या विकास कामांची देखील माहिती दिली. .बाजार समितीची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार (ता. ३०) रोजी बाजार समितीचे सभापती आहेर यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. .यावेळी बाजार समितीचे उपसभापती पंढरीनाथ खताळ, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, संचालक सर्वश्री डॉ. आत्माराम कुंभार्डे, डॉ. सयाजीराव गायकवाड, योगेश ढोमसे,कारभारी आहेर, डॉ. राजेंद्र दवंडे, मिना शिरसाठ, विक्रम मार्कंड, संजय जाधव, वाल्मीक वानखेडे, गणेश निंबाळकर, सचिन अग्रवाल, सुशिल पलोड, रवींद्र पवार, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे, डॉ. शामराव जाधव, बापू शिरसाठ, व्यापारी व माथाडी कामगार प्रतिनिधी, बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी व समितीचे इतर घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. .APMC Pune: शेतीमाल प्रक्रिया मूल्यवर्धन प्रकल्प उभारणार.सभेत मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे सभावृत्तांत, आर्थिक पत्रके व सन २०२४–२५ चा वार्षिक अहवाल वाचून दाखविण्यात आला. यावर सभागृहात सविस्तर चर्चा करून मागील सभेचे सभावृत्तांत व उत्पन्न-खर्चाची वाचून नोंद घेण्यात आली. वडाळीभोई उपबाजार आवार येथे व्यापारी वर्गाच्या मागणीनुसार नविन व्यापारी गाळ्यांचे बांधकाम सुरु करण्याची कार्यवाही सुरू आहे..बाजार समितीस गत वर्षात ५ कोटी ५८ लाख उत्पन्न झालेले असून मार्च २०२५ अखेर २कोटी ८ लाखाचा वाढावा शिल्लक आहे.तसेच बाजार समितीने मुदत ठेवीत ६ कोटींची गुंतवणुक केली आहे.या निधीतून बाजारमध्ये विकास कामांचे नियोजन करण्यात येत आहे. .Chandwad APMC : चांदवड बाजार समिती सभापतींवर अविश्वास.शेतकऱ्यांना माफक दरात माती-पाणी परिक्षणासाठी प्रयोगशाळा उभारणी केलेली असून त्याचा लाभ शेतकरी वर्गांनी घ्यावा. त्याचप्रमाणे वडनेरभैरव येथे मूलभूत सुविधा उभारणी करून भाजीपाला व द्राक्षमणी या शेतीमालाचे लिलाव सुरु करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली..कर्जमाफी व सरसकट आर्थिक मदतीचा ठरावबाजार समितीचे संचालक शिरीषकुमार कोतवाल यांनी ठराव मांडला की, यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले आहे.तसेच शेतीमालास कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी पूर्णतः बेजार झालेला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलेला शब्द पाळावा व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, असा ठराव मांडला त्यांस संपतराव वक्टे यांनी अनुमोदन दिले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.