Chandrapur News: जंगल परिसरात सध्या मोहफूल आणि तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू होत असून जंगलात नागरिकांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी या काळात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडल्याची नोंद असल्याने यंदाही नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे..नागभीड तालुका हा जंगलव्याप्त भाग म्हणून ओळखला जातो. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ५१ हजार ६६० हेक्टर असून त्यापैकी सुमारे १४ हजार २७१ हेक्टर क्षेत्र जंगलाखाली आहे. या जंगलात मोह आणि तेंदूची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. तसेच वाघ, बिबट यांसारख्या वन्यप्राण्यांचेही येथे अधिवास आहेत. त्यामुळे मोहफूल व तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे..Unseasonal Rain: धारूर, वडवणीत पावसाचा धुमाकूळ.दरवर्षी आर्थिक उत्पन्नासाठी परिसरातील अनेक गावांतील नागरिक मोहफूल आणि तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जातात. वन विभागाने गोविंदपूर, मोहशी दोरपा, बोडा, बाळापूर, कोसबी गवळी आणि डोंगरगाव परिसरातील गावांना विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. या भागात वाघ किंवा बिबट्याचे दर्शन अधूनमधून होत असल्याने नागरिकांनी समूहाने जंगलात जाणे, एकटे न जाणे तसेच सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेश टाळावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.MohphoolSeason.Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव.वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वाघांच्या अधिवास असलेल्या वनक्षेत्रात विनाकारण प्रवेश टाळावा. सकाळी ६ वाजण्यापूर्वी जंगलात जाऊ नये तसेच संध्याकाळी ५ वाजण्यापूर्वी जंगलातून बाहेर पडावे, असेही सांगण्यात आले आहे. संकलनासाठी केवळ मंजूर गावांतील व्यक्तींनाच परवानगी देण्यात येणार असून संकलनाच्या वेळी वन विभागाशी समन्वय ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे..खबरदारी आवश्यकजंगलात वाघाचा वावर आढळल्यास नागरिकांनी तत्काळ त्या भागातून मागे फिरावे आणि वन विभागाला माहिती द्यावी. मोहफूल व तेंदूपत्ता हंगामात वन्यप्राण्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.