Chandrapur News: कोळसा खाण, व्याघ्र प्रकल्पांसह इतर कामांसाठी शेतीचे अधिग्रहण होत असल्याचा मोठा परिणाम चंद्रपूर तालुक्यातील खरीप आणि रब्बी हंगामावर झाला आहे. चंद्रपूर बाजार समितीमधील आवकेवर देखील याचा परिणाम झाला असून शेतीमालाची आवकच नसल्याने ऐन हंगामात शेड ओस पडल्याचे चित्र आहे. .चंद्रपूर हा वाघांची राजधानी म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्यातील ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प सर्वदूर प्रसिद्ध आहे. जंगलक्षेत्र अधिक असल्याने या भागात मानव-वन्यजीव संघर्ष देखील वाढीस लागला आहे. त्याचा परिणाम शेतीकामावर झाला असताना गेल्या काही वर्षांत सातत्याने कोळसा खाणीकरीता वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडकडून परिसरात जमिनीचे अधिग्रहण केले जात आहे. .Barshi APMC Election: बार्शी बाजार समिती निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरु.गावच्यागावे याकरिता स्थलांतरित होत असल्याने त्यातूनही सुपीक जमिनीचा वापर प्रकल्पांकरिता वाढला आहे. त्यामुळे पेरणीखालील क्षेत्रात सातत्याने घट होत असल्याची माहिती चंद्रपूर बाजार समितीचे सभापती गंगाधर वैद्य यांनी दिली. तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने यांच्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी २४ हजार हेक्टर क्षेत्र वहितीखाली असताना ते आता १८ हजार हेक्टरवर आले आहे. त्यावरूनच पेरणीखालील क्षेत्रात घट होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामागील नेमकी कारणे सांगण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली. मात्र या साऱ्याचा परिणाम चंद्रपूर बाजार समितीतील शेतीमालाच्या आवकेवर देखील झाला आहे. .त्यातच यंदा संपूर्ण खरीप हंगामात पावसाची संततधार होती. त्यामुळे सोयाबीन, कपाशी या खरिपातील मुख्य पिकांची उत्पादकता प्रभावित झाली. ऐन शेतमाल काढणीच्यावेळी हा पाऊस झाल्याने मालाचा दर्जाही खालावला. त्यामुळे बाजारात कामकाज ठप्प असल्याचे चित्र आहे. बाजार समितीमध्ये उलाढाल असल्यास अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र आवकच नसल्याने अनेकांच्या रोजगारावर देखील याचा परिणाम झाला आहे. .शेतीक्षेत्र कमी होण्यासोबतच यंदाच्या पावसामुळे पिकांची उत्पादकता घटली त्यामुळे बाजारात ऐन हंगामात आवक कमी आहे. चंद्रपूर बाजार समितीचे ‘सेस’च्या माध्यमातून होणारे उत्पन्न पाच कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यामध्ये दोन कोटी रुपये भाजीपाला उलाढालीतून मिळतात. भाजीपाला देखील राज्याच्या इतर भागातून येतो. शेतीमालाच्या उलाढालीतून मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे. - गंगाधर वैद्य, सभापती, बाजार समिती, चंद्रपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.