Chandrapur News : महाराष्ट्रात १९५७ पासून राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू असतानाही चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीपाय (फायलेरियाचा) आजाराने गंभीर रूप धारण केले आहे. सध्या राज्यात सुमारे २८ हजारांहून अधिक रुग्ण असून त्यातील तब्बल ९ हजार १८० रुग्ण एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आढळले आहेत..क्युलेक्स व मॅनसोनिया प्रजातीच्या डासांमुळे पसरणाऱ्या या आजारामुळे पाय, हात, तसेच जननेंद्रियामध्ये सूज येते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, सलग पाच वर्षे दरवर्षी एकदा प्रतिबंधात्मक औषध घेतल्यास हा आजार पूर्णतः नियंत्रणात आणता येतो. याच पद्धतीने जगातील १९ देशांनी हत्तीपाय रोगाचे निर्मूलन केले आहे..Livestock Health: पशू आरोग्यासाठी वेळेवर लसीकरण आवश्यक.चंद्रपूर जिल्ह्यात हिवताप कार्यालयाकडून दरवर्षी १६ ते ३१ ऑगस्टदरम्यान विशेष सर्व्हेक्षण करण्यात येते. २०२५ मधील पाहणीत ब्रह्मपुरी तालुक्यात सर्वाधिक १,५८७ रुग्ण आढळले असून नागभीड (१,०६८), चिमूर (१,०६६),.Digital Health: ...तर विक्रेते-मार्केटिंग कंपन्या दोषी नाहीत!.सावली (९३५) व सिंदेवाही (७६३) तालुके पुढे आहेत. चंद्रपूर शहरातही ४०६ रुग्ण नोंदले गेले. यासोबतच जिल्ह्यात अंडवृद्धीचे ३१६ रुग्णही आढळून आले आहेत. धानशेतीमुळे दलदलीचे वातावरण निर्माण होऊन डासांची पैदास वाढते, त्यामुळे ग्रामीण भागात धोका अधिक आहे..जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे म्हणाले, की हत्तीपाय रोग आटोक्यात आणण्यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबवली जाते. या मोहीमेदरम्यान घरोघरी जाऊन प्रतिबंधात्मक औषधे दिली जातात. नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता या गोळ्या घ्याव्यात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.