Chandrapur News : जून ते ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टीसह पावसाची संततधार होती. याचा फटका शेतीपिकांना बसत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र त्यानंतरही शासन आदेशात जिल्ह्याला भरपाईपासून वंचित ठेवण्यात आले. हा प्रकार अन्यायकारक असून हा अन्याय दूर करीत चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मदत मिळावी, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भाने त्यांनी पत्र लिहिले आहे. त्यानुसार, महसूल व वनविभागाने २३ सप्टेंबर रोजी शासन आदेश काढला. त्यानुसार चंद्रपूर वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी शेतमालाच्या नुकसानीपोटी भरपाईची तरतूद करण्यात आली. जून ते ऑगस्ट या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्याला देखील पावसाचा मोठा फटका बसला. .Crop Damage Compensation : अतिवृष्टी नुकसान मदतीसाठी ‘फार्मर आयडी’ बंधनकारक.अनेक भागात अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य पावसाच्या परिणामी नद्या, नाल्यांना पूर येत जमीन खरडून गेली, काही भागात पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानीची कोणतीच दखल शासनाने घेतली नाही. त्यानंतर आता देखील जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्याचा फटका पारंपरिक त्यासोबतच भाजीपाला व फळपीकधारक शेतकऱ्यांना बसला आहे. कापूस, तूर, सोयाबीन यासारखी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. .Kharif Onion Crops Damage : अतिवृष्टीचा खरीप, लेट खरीप कांद्याला फटका, ८० टक्के पिकाचे नुकसान.सतत ढगाळ वातावरण असल्याने सोयाबीन पिकावर खोडकूज, मुळकूज आणि येलो मोझॅक या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यातूनच उभे पीक पिवळे पडून नष्ट झाले आहे. या साऱ्या प्रकाराची राज्य सरकारने तत्काळ दखल घेत जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. त्यासोबतच २३ सप्टेंबर २०२५ रोजी निर्गमित शासनाच्या भरपाई आदेशात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करीत बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम वळती करण्यात यावी, अशी मागणी देखील खासदार धानोरकर यांनी केली आहे..दरम्यान शासनाने जून व जुलै महिन्यांतील नुकसानीपोटी मदत निधी आधीच पाठविला असल्याचे प्रशासनातील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यासोबतच ऑगस्टमधील अहवाल देखील पाठविल्याची माहिती आहे. मात्र त्यानंतरही आदेशात चंद्रपूरचा समावेश का करण्यात आला नाही? या बाबत मात्र अधिकाऱ्यांकडे कोणतेच उत्तर नव्हते..चंद्रपूर जिल्ह्याला फटकाऑगस्टमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे १५ हजार २७५ हेक्टर पिकांचे नुकसान झाले. यामुळे १५ हजार ७३९ शेतकऱ्यांचे तब्बल १२ कोटी ५३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. मात्र या नुकसानीचा अहवाल पाठविण्यास स्थानिक प्रशासनाकडून विलंब झाल्याने मदतीपासून वंचित राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.