Solapur Rain News : पंढरपूर तालुक्यात सध्या भीमा आणि माण नदीची दोन वेगवेगळी रूपे पाहायला मिळत आहेत. एकीकडे चंद्रभागा दुथडी भरून वाहत असताना, दुसरीकडे काही अंतरावर असलेली माण नदी मात्र कोरडीठाक पडल्याचे विरोधाभासी चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील निसर्गाचा हा चमत्कार येथील शेतकरी याची देही, याची डोळा अनुभवत आहेत..यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे सर्वत्र पाऊस कमी पडेल, असा सुरुवातीला अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, हवामानाचे अंदाज फोल ठरवत राज्यभर जोरदार पाऊस सुरू आहे. भीमा खोऱ्यातील पावसामुळे उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. .River Conservation: ...और कारवाँ बनता गया.पूर नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मागील तीन-चार दिवसांपासून भीमा नदी दुथडी भरून वाहत असून, पंढरपूर तालुक्यात नदीला पूर आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी शिरले आहे. .Bhima River Flood Situation : भीमा नदीला पूरस्थिती कायम.मात्र दुसरीकडे याउलट चित्र पाहायला मिळत आहे. माण नदी कोरडी असल्याने पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत. माण नदीचा उगम दुष्काळी म्हसवड येथे होतो आणि तिचा पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे संगम होतो..एकीकडे चंद्रभागेला पूर आला असताना, दुसरीकडे शेजारून वाहणारी माण नदी कोरडी असल्याचे सध्याचे चित्र आहे. उजनी धरणातून दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात आले आहे. उजव्या कालव्यातून माण नदीत पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.