Farmer Advisory: रब्बी हंगाम २०२५-२६ मधील हरभरा खरेदीला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानेच हरभरा विक्री करावी, असे आवाहन हिंगणघाट बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी यांनी केले..येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात खरेदी प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. मुहूर्ताला शेतकरी नामदेव चांभारे यांनी ३० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आणला होता. ॲड. कोठारी व मान्यवरांच्या हस्ते काटा पूजन करून खरेदीला सुरुवात झाली..Chana Procurement: ‘पणन’च्या ३४ केंद्रांवर हमीभावाने ६१ हजार क्विंटल हरभरा खरेदी.केंद्र शासनाने चण्याचा आधारभूत दर ५,७५० रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे. तर खुल्या बाजारात सध्या ४,५०० ते ५,२५० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी दरात माल विकण्याऐवजी शासनाच्या खरेदी केंद्रांवर विक्री करावी, असे आवाहन करण्यात आले..खरेदी प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीसाठी आधारकार्ड, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि ७/१२ उताऱ्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. .Chana Market : हमीभावाने हरभरा विक्री नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ.आतापर्यंत जिल्ह्यात १,९६७ शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती देण्यात आली. यावेळी उपसभापती हरीश वडतकर, संचालक ओमप्रकाश डालिया, प्रफुल्ल बाडे, राजेश मंगेकर, पंकज कोचर, संजय कातरे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दिगंबर चांभारे, व्यापारी भागचंद ओस्तवाल, पवन अग्रवाल, श्रीकांत करवा, तेजस तडस, मनीष चितलांगे, गणेश चंदनखेडे आदी उपस्थित होते. .शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करूनच हरभरा विक्री करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. .खरेदीची अटी व मर्यादा प्रतिदिन एका शेतकऱ्याकडून जास्तीत जास्त ४० क्विंटल चणा खरेदी नोंदणीनंतर एसएमएसद्वारे खरेदीची तारीख कळविण्यात येणार शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत हमीभावाने खरेदी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.