Nashik News: राज्य शासनाने घोषित केलेल्या राज्यातील मधाच्या पहिल्या १० गावांमध्ये नाशिक जिल्ह्यातील चाकोरे (ता. त्र्यंबकेश्वर) या गावाचा समावेश आहे. ‘मधाचे गाव’ योजनेअंतर्गत येथे मधमाशीपालन प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते. .दहादिवसीय बौद्धिक व तांत्रिक प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमात २५ लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले, अशी माहिती प्रभारी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, नाशिक वैशाली भामरे यांनी दिली. या गावात सामूहिक सुविधा केंद्र, मधमाशीपालन माहिती दालन, मधाचे गाव दर्शनी कमान, सेल्फी पॉइंट तसेच मधबन उभारणी यांसाठी शासनाने ४०.१२ लाख इतका निधी मंजूर केला आहे..Bee Keeping: मधमाशीपालनात कला, प्रयोगांचा संगम .या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत करण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना मधपेट्या व साहित्य खरेदीसाठी ‘मधाचे गाव’ योजनेतून ९० टक्के अनुदान व १० टक्के लाभार्थी हिस्सा या तत्त्वावर सातेरी मधमाश्यांच्या १२५ वसाहतींसह मधपेट्या, मधयंत्रे व इतर मध उद्योग साहित्याचा पुरवठा केला जाणार आहे..Bee keeping: शेतकऱ्यांनी गिरवले मधमाशीपालनाचे धडे.याशिवाय, गावात २५ ते ५० सातेरी मधमाश्यांच्या पेट्यांचे सामूहिक मधुबन स्थापन करण्यात येणार असून त्याद्वारे शेतकरी, पर्यटक व विद्यार्थ्यांना मधमाशी पालनाबाबत प्रात्यक्षिक मार्गदर्शन व जनजागृती करण्यात येणार आहे.प्रशिक्षण कालावधीत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व माजी संचालक दिग्विजय पाटील भेट देत प्रकल्प स्थळांची पाहणी केली..लाभार्थ्यांना मधमाशीपालन उद्योगातील तज्ज्ञ तुकाराम निकम, कृषी विज्ञान की केंद्राचे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नितीन ठोके, नितीन भोये, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे निरीक्षक वसंत चौधरी तसेच जिल्ह्यातील मध उद्योग मास्टर ट्रेनर नितीन काळे, गजानन मालोराव व सचिन जाधव यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी व लाभार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.