Public Services: चाकण नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेला २०२५-२६ या आर्थिक वर्षात २ कोटी ३१ लाख रुपयांच्या आर्थिक तुटीचा सामना करावा लागत आहे. योजनेचा खर्च ४.६८ कोटींवर पोहोचला असून, त्या तुलनेत वसुली केवळ २.३७ कोटी रुपये आहे..शहराला जुन्या पाणीपुरवठा योजनेद्वारे आणि एमजेपीकडून पाणीपुरवठा केला जातो. नगरपरिषदेकडे सध्या १३ हजार अधिकृत नळजोड आहेत. यामध्ये घरगुती वापरासाठी ११५० रुपये, बिगर घरगुतीसाठी २८०० रुपये, तर व्यावसायिक वापरासाठी ४२०० रुपये वार्षिक पाणीपट्टी आकारली जाते. मोठ्या गृहप्रकल्पांना ४ इंचापर्यंतचे नळजोड दिले आहेत. .Irrigation Water Issue: गाळामुळे गडहिंग्लजला पाटबंधारे लघू प्रकल्पातील साठा अल्प.मात्र, देखभाल-दुरुस्तीचा वाढता खर्च आणि एमजेपीची पाणीपट्टी यामुळे खर्चाचा आकडा वाढला आहे. उत्पन्नापेक्षा खर्च दुप्पट असल्याने नगरपरिषदेसमोर या तुटीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे..Water Scarcity: वर्ध्यावर पाणीटंचाईचे सावट.दृष्टिक्षेपातएकूण पाणीपट्टी २०२५-२६ २.३७ कोटी रुपयेपाणीपट्टी वसुली१.२६ कोटी रुपयेवसुलीची टक्केवारी५३.१६ टक्के.नागरिकांनी पाणीपट्टी भरण्यास सहकार्य करावे. पाणीपुरवठ्यावरील दुरुस्ती व देखभाल खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील अनधिकृत नळजोड यांचा सर्व्हे करण्यात येणार आहे व अनधिकृत नळजोड काढून टाकणार आहे.- सुमीत काळोखे, उपाभियंता, पाणीपुरवठा विभाग, चाकण.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.