Nanded News : राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान कडधान्ये, पौष्टिक तृणधान्ये पिके अंतर्गत पाच हजार १४६ क्विंटल प्रमाणित बियाणे वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर शेतकरी लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे..हरभरा पिकाच्या १० वर्षांआतील वाणांसाठी पाच हजार रुपये प्रति क्विंटल व १० वर्षांवरील वाणांसाठी दोन हजार ५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देय आहे. जिल्ह्याकरिता १० वर्षांआतील वाणाकरिता २१६० क्विंटल व १० वर्षांवरील वाणांकरिता २१८१ क्विंटल लक्ष्यांक प्राप्त झाला आहे..Rabi Season: रब्बी हंगामाला सुरुवात; योग्य मशागतीतून वाढवा उत्पादन!.रब्बी ज्वारीच्या १० वर्षांआतील वाणांसाठी ३ हजार रुपये प्रति क्विंटल व १० वर्षांवरील वाणांसाठी १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देय आहे. जिल्ह्याकरिता १० वर्षांआतील वाणाकरिता १०० क्विंटल व १० वर्षांवरील वाणांकरिता २६० क्विंटल लक्ष्यांक प्राप्त झाला आहे. .गहू पिकाच्या १० वर्षांआतील वाणांसाठी २ हजार रुपये प्रति क्विंटल व १० वर्षांवरील वाणांसाठी १ हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान देय आहे. जिल्ह्याकरिता १० वर्षांआतील वाणांकरिता २९८ क्विंटल व १० वर्षांवरील वाणांकरिता १४७ क्विंटल लक्ष्यांक प्राप्त आहे. प्रमाणित बियाणे वितरण या घटकातर्गत आर्थिक साह्य प्रति शेतकरी किमान २० गुंठे ते कमाल १ हेक्टरपर्यंत मर्यादित आहे..Rabi Season : परभणी जिल्ह्यात ४ हजार ४४५ क्विंटल रब्बी बियाणे वाटपाचा लक्ष्यांक.वैयक्तिक शेतकरी यांनी संबंधित महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड, कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड यासंस्थेच्या अधिकृत वितरकांमार्फत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वांवर लाभार्थी निवड करण्यात येत आहे. .त्यासाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, आधार कार्ड, सातबारा उतारा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.