Wardha News: लहान आर्वी येथील ग्रामपंचायतीला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत केलेल्या कामाचा आढावा घेतला. गावाच्या विकास कामांची सुद्धा सविस्तर माहिती घेतली..या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, गटविकास अधिकारी नागेश ढोरे, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता गढवे, विस्तार अधिकारी हर्षल कालोकर प्रामुख्याने उपस्थित होते..Sustainable Village Development: राज्यपालांनी घातली शाश्वत ग्रामविकासाची साद.श्री. सोमण यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विविध विकास योजनांची माहिती घेतली. या वेळी त्यांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, शौचालये, अंगणवाडी व शाळा आणि इतर मूलभूत सोयी-सुविधांच्या स्थिती बद्दल माहिती घेतली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत असलेली प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना ग्रामपंचायत अधिकारी अनुराधा धारपुरे आणि सरपंच सुनील साबळे यांना देण्यात आल्या..Village Development: ग्रामविकासाचा दीर्घकालीन आराखडा मांडताना....गावातील महिलांच्या बचतगट, विठ्ठल रुक्मिणी महिला भजन मंडळ, युवक व शेतकरी बांधवांशीही त्यांनी संवाद साधला. या वेळी घर टॅक्स आणि पाणी टॅक्स वसुली साठी उमेद बचत गटाने सहभाग देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत विद्यार्थ्यांनी नाटिका, पोवाडा सादर केला. ते पाहून शिक्षकांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. .या वेळी उपसरपंच अमोल होले, ग्रा. प. सदस्य सागर नागापुरे, कुसुम सरदार, ज्योती गायकी, सोनाली राऊत, भाग्यश्री निभोरकर, रेश्मा माथने, उमेद तालुका व्यवस्थापक संदीप काबळे, तालुका समन्वयक हर्षल चौधरी, सारिका पेठे, सीमा नागपुरे, वनिता साबळे, नीलिमा देशमुख, कृषी सखी रेखा आकोलकर, कृषी पर्यवेक्षिका कौसल्या मुसळे, सहायक कृषी अधिकारी चंचल देशमुख, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रमोद गावनेर, मुख्याध्यापक तारा राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक वाघमारे, सेवा सहकारी सोसायटीचे सचिव विलास गुबळे उपस्थित होते. संचालन नीलिमा देशमुख यांनी केले. तर सरपंच सुनील साबळे यानी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.