Dahanu News: केंद्र सरकारच्या विशेष आर्थिक क्षेत्र (ईईझेड) नवीन नियमांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ज्यानुसार मच्छीमारांना आता नवे क्यूआर कोड ओळखपत्र दिले जाणार आहे, मात्र छोट्या आणि पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे. .गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मासेमारी व्यवसायात सक्रिय असणाऱ्या मासेमारांसाठी विशेष, नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांअंतर्गत खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना ही नवी नियमावली लागू असेल. .Loan Waive : मच्छीमारांना कर्जमाफीची प्रतीक्षा.समुद्रात मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्याला प्रोत्साहन देण्याबरोबरच, विदेशी जहाजांना भारतीय हद्दीत मासेमारी करण्यापासून रोखण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने विशेष आर्थिक क्षेत्रांतर्गत समुद्रात दूरवर मासेमारीसाठी जाणाऱ्यांकरिता नवीन नियमांची अधिसूचना लागू केली आहे. या नवीन नियमात, एलईडीद्वारे मासे पकडणे, पेयर ट्रॉलिंग आणि बुल ट्रॉलिंगसारख्या हानिकारक मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे..Fisherman Issue : मच्छीमारांना ड्रोनची डोकेदुखी?.तसेच मासेमारी करण्यासाठी कायदेशीर अंतर ठरवून राज्यासोबत मत्स्य योजना तयार केली जाणार आहे. त्यासाठी एक प्रवेश पास तयार करून तो ऑनलाइनद्वारे मोफत उपलब्ध केला जाणार आहे. मासेमारीसाठी खोलवर दूर समुद्रात जाणाऱ्या जहाजामध्ये ट्रान्सपोंडर बसविणे बंधनकारक करण्यातआले आहे..सागरी सुरक्षामच्छीमारांना क्यूआर कोडयुक्त ओळखपत्रे दिल्यास देशाच्या सागरी सुरक्षेला मोठी मदत होऊ शकणार आहे. सागरी सीमा विस्तीर्ण असल्याने सुरक्षा यंत्रणांसमोर ओळख पटवणे आव्हानात्मक ठरते. या पार्श्वभूमीवर क्यूआर कोड प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. या ओळखपत्रांमुळे देशाच्या किनारपट्टीवरील हालचालींची नोंद, तस्करी, दहशतवादी घुसखोरी यांसारखे सुरक्षाविषयक धोके टाळता येणार आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.