Nashik News: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खरीप व लेट खरीप लागवड व साठवलेल्या कांद्याचे नुकसान पाहण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे तीन सदस्यीय पथक राज्याच्या दौऱ्यावर आले आहे. या पथकाने थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा केंद्राचे पथक कांद्याच्या पाहणीसाठी आल्याने केंद्राला कांदा उपलब्धतासंबंधी धास्ती कायम असल्याचे पुढे आले आहे..१ ते ३ ऑक्टोबर दरम्यान राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात क्षेत्रीय पाहणी करण्यात आली. पथकामध्ये कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. नवीन पटले, फलोत्पादन विभागाचे उपायुक्त रोहित बिष्ट, फलोत्पादन सांख्यिक विभागाचे सहायक संचालक हेमांग भार्गव आदींचा या पथकात समावेश होता..Kharif Onion Crops Damage : अतिवृष्टीचा खरीप, लेट खरीप कांद्याला फटका, ८० टक्के पिकाचे नुकसान.पथकातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कांदा लागवडीच्या प्रक्षेत्रावर जाऊन कांदा उत्पादक शेतकरी व राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. या वेळी नाशिकचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, कृषी उपसंचालक महेश विटेकर, तालुका कृषी अधिकारी नीलेश माळवे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. चांदवड तालुक्यातील मालसाने व पिंपळगाव धाबळी येथे त्यानंतर येवला तालुक्यातील तांदुळवाडी, अनकुटे येथे पाहणीसाठी रवाना पथक झाले. या वेळी कांदा लागवडी व चाळीतील साठवलेल्या कांद्याची स्थिती पाहिली..Onion Farming: साताऱ्यात पावसाची कांदा रोपे निर्मितीत अडचण .काही ठिकाणी तुलनेत नुकसान कमी आहे. मात्र काही ठिकाणी पूर्णता नुकसान असल्याची स्थिती आहे. अशी संमिश्र स्थिती असली तरीही प्रमुख नुकसानग्रस्त भागात या पथकाने पाहणी केलेली नाही. त्यामुळे नेमका अहवाल कसा सादर केला जाणार हे पाहणे अपेक्षित आहे..पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा पथकाकडून पाहणीखरीप कांद्याची लागवड स्थिती संभाव्य उत्पादकता रब्बी कांद्याची उपलब्धता व बाजारातील आवक यासंदर्भात केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे तीन सदस्यीय पथक १६ ते १९ सप्टेंबरदरम्यान राज्य दौऱ्यावर आले होते. यामध्ये कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या संचालिका सुचित्रा यादव, उपसंचालक रवींद्र कुमार, कृषी व शेतकरी कल्याण विभाग उपसचिव के. मनोज यांचा समावेश होता. या पथकाने नाशिकसह, अहिल्यानगर, पुणे व सोलापूर या जिल्ह्यात क्षेत्रीय भेटी देऊन पाहणी केली. तर आता दुसऱ्यांदा अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खरीप व लेट खरीप कांद्यासह चाळीत साठवलेल्या कांद्याची पाहणी पथकाद्वारे करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.