Maharashtra Agriculture : यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येत्या आठवडाभरात यवतमाळ जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने तयारी सुरू केली असून, पथकाकडून प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पिकांची स्थिती आणि नुकसानीची पाहणी केली जाणार आहे..यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन, कपाशी आणि तूर या प्रमुख पिकांच्या उत्पादनावर अनेक भागांत परिणाम झाला आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे..Solar Lighting Units Distribution हातमाग योजनेतून ४८ विणकरांना सोलर लायटिंग युनिटचे वितरण.पथकाकडून केवळ कागदोपत्री माहितीचा आढावा न घेता प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती जाणून घेतली जाणार असल्याची माहिती आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून पीकनिहाय नुकसान, उत्पादनातील घट आणि प्रभावित क्षेत्राची माहिती संकलित केली जात आहे. .Jal Jeevan Mission 2.0: ‘मिशन’ फत्ते करा.कोणत्या भागात पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, याची माहिती पथकाला देण्यासाठी संभाव्य पाहणीस्थळांचीही तयारी केली जात आहे. पथकाकडून शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसातील खंड, पिकांची सद्यःस्थिती, उत्पादनातील घट आणि दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेतल्या जाण्याची शक्यता आहे. .त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे वास्तव केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यास मदत होणार आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणी अहवालाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या अहवालाच्या आधारे दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून कोणत्या स्वरूपाची मदत मिळते, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.