Solapur News: अतिवृष्टी आणि महापुराने झालेल्या नुकसानीच्या प्रत्यक्ष पाहण्यासाठी केंद्र शासनाचे चार सदस्यीय पथक मंगळवारी (ता. ४) सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले. मात्र या पाहणीचा संपूर्ण कार्यक्रम ‘रात्रीच्या अंधारात’ उरकण्यात आल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमांवर मलमपट्टी करण्याऐवजी केवळ ‘औपचारिकता’ पार पाडल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे..सीना नदीच्या महापुराने यंदा मोहोळ, माढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यांत शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली, घरं उद्ध्वस्त झाली, रस्त्यांची धूळधाण उडाली. तरीदेखील केंद्रीय पथकाने या भागात पाहणीसाठी येण्यास महिनाभर लावलाच, पण इथे येतानाही ते दिवसा न येता त्यांनी रात्री भेट देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या दौऱ्याची पारदर्शकता आणि गांभीर्य यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे..Crop Loss Inspection: मोखाड्यात शेतीच्या नुकसानीची पुन्हा नजर पाहणी.पथकात केंद्रीय ग्रामविकास विभागाचे अवर सचिव अभिषेक कुमार, ऊर्जा विभागाचे उपसंचालक करण सरीन, वित्त विभागाचे उपसचिव कंदर्फ पटेल आणि जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्रप्रताप सिंग यांचा समावेश होता..Collector Inspection Visit: सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना दिला धीर.त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले आदी अधिकाऱ्यांसह चर्चा केली. परंतु शेतकऱ्यांशी झालेला संवाद ‘औपचारिक’ स्वरूपाचा होता, अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा सादर करण्यात आला. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टिबाबत प्राथमिक अंदाजही दाखविण्यात आला आहे..हत्तूर भागात पाहणीकेंद्रीय पथकाने दौऱ्यावर यायला उशीर केलाच, पण रात्री उशिरा आल्यानंतर बॅटऱ्या लावून कोळेगाव (ता. बार्शी) शेतीची, घरांची पाहणी केली. घाईघाईत या पथकाने दौरा उरकल्यानंतर शेतकऱ्यांसह नेत्यांनीही टीकेची झोड उठवली. पण त्यानंतर बुधवारी (ता. ५) मात्र शहरानजीक दक्षिण सोलापुरातील हत्तूर येथील नदीची आणि पुलाची तसंच पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.