Nashik News: कांदा दरात मोठी घसरण झाली असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने याप्रकरणी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केंद्रीय सचिव टी. व्ही. सोमनाथन यांची भेट घेऊन केली. .डॉ. बच्छाव यांनी या भेटीत कांदा उत्पादनाचा वास्तविक खर्च आणि सरकारी आकडेवारी यातील तफावत सचिवांच्या निदर्शनास आणून दिली. ‘‘शासकीय पातळीवर कांद्याचा उत्पादन खर्च ७०० ते ८०० रुपये गृहीत धरला जातो, मात्र प्रत्यक्षात लागवड ते काढणीपर्यंत खर्च १५०० ते १८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. काढणीनंतर होणारे २० ते ४० टक्के नुकसान विचारात घेता शेतकरी मोठ्या आर्थिक गर्तेत अडकला आहे,’’ असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केंद्राचे लक्ष वेधले..Nampur Onion Market: नामपूर बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक.नाशिक व धुळे जिल्ह्यांत काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे प्रचंड नुकसान आहे. खराब झालेला कांदा साठवून ठेवता येत नसल्याने शेतकरी तो बाजारात विकण्यास आणतो. अशा वेळी आवक वाढल्याने दर कोसळतात. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे बाजारभावातील घसरण यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे..Onion Prices: कांदा दरातील घसरण थांबवा.कांदा धोरणातील त्रुटी आणि निर्यातीबाबतच्या अस्थिर निर्णयांचा मोठा फटका स्थानिक व्यापारी आणि शेतकऱ्यांना बसत आहे. विशेषतः बांगलादेशने आयात परवाने थांबवल्यामुळे नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील बाजारपेठांवर गंभीर परिणाम झाला असून, मोठ्या प्रमाणात माल पडून आहे, असेही त्या म्हणाल्या..कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, उत्पादन खर्चाचा योग्य विचार करून धोरणात्मक निर्णय घ्यावेत आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील.डॉ. शोभा बच्छाव, खासदार, धुळे लोकसभा मतदारसंघ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.