Amravati News: नळदमयंती सागर (अप्पर वर्धा धरण) गेटसमोरील मोर्शी व आष्टी या दोन तालुक्यांना थेट जोडणारा दीर्घकाळ प्रलंबित पूल बांधण्यास अखेर केंद्राची मंजुरी प्राप्त झाली आहे. तब्बल ३५ कोटी रुपयांचा निधी प्रकल्पासाठी मंजूर झाल्याने स्थानिक नागरिकांच्या अनेक दशकांपासूनच्या मागणीची पूर्तता होणार आहे..हा पूल अप्पर वर्धा धरणाच्या बांधकामावेळीच बांधण्यात आला आहे. तो जुना झाल्यामुळे नव्याने पूल बांधणे अत्यंत गरजेचे होते. या पुलावर नेहमीच मोठी वर्दळ असते. त्यातल्या त्यात धरणातून पाणी सोडल्यानंतर येथे अधिक दक्षता बाळगण्याची गरज भासते. कोणतीही अनुचित घटना घडू शकते. त्यामुळे धरणाच्या गेटसमोर उंच पुलाची गरज होती. या संदर्भाने स्थानिक नागरिकांची मागणी, तसेच लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यामुळे केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. या पुलाचे बांधकाम झाल्यास नागरिकांना सुविधा होईल..Water Storage : नळगंगा धरण प्रकल्पात ६९ टक्के पाणीसाठा .या पुलासाठी आमदार उमेश ऊर्फ चंदू यावलकर यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. विभागीय स्तरापासून दिल्लीपर्यंत अनेकदा बैठका घेऊन त्यांनी हा विषय गांभीर्याने मांडला..Tourism Policy: धरण क्षेत्रांतील पर्यटनाच्या जागांचा होणार ‘बाजार’.या निर्णयामागे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे आमदार यावलकर यांनी सांगितले. तसेच प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार व्यक्त केले. पूल पूर्ण झाल्यानंतर मोर्शी-आष्टी दरम्यानचा प्रवास मोठ्या प्रमाणात सुलभ होणार असून शेती, व्यापार, शिक्षण आणि आरोग्यसेवा परिपूर्तीत गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे संपूर्ण परिसराला विकासाची नवी दिशा लाभणार असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे..जुन्या पुलाची अवस्थासध्याचा पूल ३२ वर्षे जुनापुलावर वाहनांची वर्दळपुलाची उंची कमीधरणातून पाणी सोडल्यानंतर घ्यावी लागते विशेष दक्षता.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.