Nashik News : खरीप कांद्याची लागवड, उत्पादनाचा अंदाज व बाजारभाव याबाबत केंद्रीय समितीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन सविस्तर आढावा घेतला..कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या संचालिका सुचित्रा यादव, उपसंचालक रवींद्र कुमार, एनएचआरडीएफ केंद्रप्रमुख डॉ. सुजय पांडे, कृषी व शेतकरी कल्याण विभाग सेक्रेटरी के. मनोज, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने (नाशिक), उपसंचालक महेश वेठेकर, जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलानी, सहायक निबंधक कांतिलाल गायकवाड व बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे या मान्यवरांनी पाहणीस हजेरी लावली..Onion Farmer Issue: केंद्राकडून स्वस्तात कांदा विक्रीचा गाजावाजा.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बाजार समितीचे सभापती डी. के. नाना जगताप, माजी सभापती जयदत्त होळकर व सुवर्णाताई जगताप, उपसभापती ललित दरेकर, संचालक राजेंद्र डोखळे, डॉ. श्रीकांत आवारे, व्यापारी प्रतिनिधी प्रवीण कदम, नितीन जैन, मनोज जैन, कांदा निर्यातदार संघटना उपाध्यक्ष विकास सिंग, शेतकरी प्रतिनिधी अभिजित डुकरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला..समितीने खरीप कांद्याचे उत्पादन, वाढते क्षेत्र, बाजारभावातील चढ-उतार तसेच अतिरिक्त उत्पादनाचा परिणाम यावर सविस्तर चर्चा केली. या वेळी रब्बी हंगामातील कांद्याच्या संभाव्य उत्पादनाचाही अंदाज घेण्यात आला..शेतकऱ्यांना उत्पादन खर्चातून योग्य परतावा मिळत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर शेतकऱ्यांना अनुदान देता येईल का, याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले..Onion Farmers Protest: उत्पादकांच्या घामाचा, अश्रूंचा हिशेब द्यावा.रेल्वेमार्फत कांदा वाहतुकीत येणाऱ्या अडचणींबाबत व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तसेच नाफेड व एनसीसीएफने खरेदी केलेल्या कांद्याच्या गुदामाची पाहणीही समितीने केली. या भेटीमुळे कांदा उत्पादक व व्यापारी यांच्यात आशावादी वातावरण निर्माण झाले आहे..बाजार समितीला भेट दिलेल्या समितीने फक्त खरीप-रब्बीचा अंदाज व आकडे वरिष्ठांना पाठविणे पुरेसे नाही. वस्तुनिष्ठ परिस्थिती समजून घेऊन खरा अहवाल द्यावा. त्यासाठी लोकप्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधींनाही समितीत सामावून घ्यावे.-भास्कर भगरे, खासदार, दिंडोरी लोकसभा.आम्ही खरीप कांद्याचे उत्पादन वाढविले, पण भाव कमी असल्याने खर्चही निघत नाही. जर केंद्र सरकार आंध्र प्रदेशाप्रमाणे अनुदान देईल, तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. समितीने आमच्या समस्या प्रत्यक्ष ऐकल्या, त्यामुळे काहीतरी सकारात्मक घडेल अशी अपेक्षा आहे.-बाळासाहेब शिंदे, कांदा उत्पादक शेतकरी, देवरगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.