Government Survey: ‘‘भारतातील सर्वात मोठी जनसहभागाची मोहीम असलेली ‘जनगणना २०२७’ केवळ आकडेवारीची गणना नसून, तो ‘विकसित भारत-२०४७’ चा मुख्य पाया आहे. हे एक अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य असून, या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व महसूल व संबंधित अधिकाऱ्यांनी जनगणनेचे प्रशिक्षण अत्यंत काळजीपूर्वक पूर्ण करावे,’’ असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी केले..जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित ‘सोलापूर जिल्हा जनगणना २०२७’ प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा जनगणना आराखडा, मनुष्यबळ आणि प्रशिक्षणाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. .Digital Census: डिजिटल जनगणनेसाठी मनपा प्रशासन सज्ज.स्वातंत्र्यानंतरची ही १६ वी जनगणना असून, संपूर्ण प्रक्रिया सीईएमएस पोर्टलच्या माध्यमातून पार पडणार आहे. यामध्ये प्रगणक आणि पर्यवेक्षकांना तंत्रज्ञानाचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्ह्यात १ एप्रिल २०२६ पासून प्रत्यक्ष ‘फिल्ड ट्रेनिंग’ला सुरुवात होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. .E Crop Survey: शिल्लक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पूर्ण करावी : अंबेकर.या कार्यक्रमास राष्ट्रीय प्रशिक्षक किरण गुरव, पवन गोडे (जनगणना कार्यालय, मुंबई), जिल्हा समन्वयक अभिजित भांड, उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे, मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, मास्टर ट्रेनर तपन डंके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.जनगणनेचे महत्त्वाचे टप्पेफिल्ड ट्रेनिंग: १ एप्रिल ते ६ एप्रिल २०२६स्वयंगणना कालावधी: १ मे ते १५ मे २०२६घरगणना कालावधी: १६ मे ते १४ जून २०२६शिरगणती (मुख्य गणना): फेब्रुवारी २०२७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.