Self Enumeration India: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ‘जनगणना २०२७’मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून आपली स्व-गणना पूर्ण केली आहे. .यामुळे राज्यातील प्रत्येक व्यक्ती, कुटुंबाला विविध पायाभूत सुविधांचा लाभ मिळावा, तसेच नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले आहे..India Population Census: लोकसंख्याच समाजाचा खरा चेहरा .उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, की जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला महाराष्ट्र राज्यात १ मेपासून सुरुवात झाली असून, ‘स्व-गणना’ प्रक्रिया १५ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. याकरिता केंद्र शासनाने https://se.census.gov.in /संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून, नागरिकांनी या संकेतस्थळाचा वापर करून आपल्या सोईनुसार अद्ययावत माहिती भरावी..Elections Voting Update: प. बंगालमध्ये पाचपर्यंत ८९, तमिळनाडूत ८२ टक्के मतदान.स्व-गणनेच्या टप्प्यानंतर१६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक गृहभेटी देणार असून, ते प्रत्यक्ष माहिती संकलित करणार आहेत. या वेळी प्रगणकास संपूर्ण सहकार्य करावे. आपण दिलेली माहिती अत्यंत गोपनीय असण्यासोबत ती कायद्याने सुरक्षित असणार आहे. .या माहितीचा वापर राज्याच्या विकास आणि नियोजनासाठी केला जाणार आहे, त्यामुळे या राष्ट्रीय मोहिमेत राज्यातील नागरिकांनी एकजुटीने सहभागी होऊन स्व-गणना करावी, असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले. या वेळी उपायुक्त तथा शहर जन गणना अधिकारी विजय लांडगे, सहायक आयुक्त तथा चार्ज अधिकारी बाळासाहेब ढवळे आदी उपस्थित होते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.