Indian Farmer Festival: आपल्या भारतीय संस्कृतीत मनुष्य, प्राणी, चंद्र, सूर्य, नदी व निसर्गास कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध सण साजरे करतात. त्याचप्रमाणे आपल्या भागात म्हणजेच महाराष्ट्रात सरत्या श्रावण महिन्यात पिठोरी अमावास्येला सर्व महाराष्ट्रात, तसेच आपल्या शेजारी असणाऱ्या तेलंगणा, कर्नाटक व मध्य प्रदेशातील सर्व बळीराजा मोठ्या उत्साहात ‘बैलपोळा’ साजरा करतात. पोळा बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो. .पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/विहिरी तसेच ओढ्यात नेऊन अंघोळ घालतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तूप किंवा तेलाने शेकतात. याला ‘खांद मळणी’ म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात..Bailpola : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात बैलपोळा साजरा.आपला बैल उठून दिसावा यासाठी बळीराजा आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. यंदा वरुण राजा जोरदार बरसत आहे आणि लम्पी आजारही फैलावत झालेला आहे. त्यामुळे लम्पी झालेल्या बैलांना इतर जनावरात मिसळू नका. लम्पीग्रस्त बैलाची योग्य काळजी घ्या. लम्पी रोगाचा प्रसार राज्यात वाढत असताना पोळा सणाच्या वेळी सावधगिरीच्या पंचसूत्रीचे पालन करूया....बैलांना नद्या, नाले, ओढे अशा ठिकाणच्या पाण्यात अंघोळ घातली जाते. अशा पाण्यात जिवाणू, विषाणू असतात. बैल अंघोळ घालत असताना हेच पाणी पितात. बैलांना जर जखमा झाल्या असतील, तर अशा जखमांमधून दूषित पाण्यातील जंतू बैलांच्या शरीरात जातात. आणि बैलांना विविध आजारांचा संसर्ग होतो. हे टाळायचे असेल तर बैलांना स्वच्छ पाण्यानेच आंघोळ घाला. जर सार्वजनिक ठिकाणी आंघोळ घातली असेल तर बैलांच्या अंगावर बाह्यपरजीविनाशक फवारा आणि त्यांना जंतुनाशक पाजा. बैलाच्या जखमांवर उपचारासाठी प्रतिजैविकांची योग्य मात्रा पशुवैद्यकाकडून टोचून घ्या..बैल जास्तीत-जास्त आकर्षक दिसावे म्हणून शेतकरी शिंगांना आकार देण्यासाठी ती साळतात. शिंग साळण्यासाठी वापरलेली वस्तू निर्जंतुक केलेली नसेल तर बैलाला जखम होऊन शिंगाच्या कर्करोग होऊ शकतो. शिंगाच्या कर्करोगावर शिंग समूळ कापणे हाच एकमेव उपाय राहतो. त्यामुळे शिंग नसलेल्या बैलाची बाजारातील किंमत कमी होते. साळण्यासाठी वापरलेली वस्तू गंजलेली असेल तर धनुर्वात होण्याची शक्यता असते..Bail Pola Festival : बैल व शेतकऱ्याचे बदलते आयुष्य!.शिंग रंगविण्यासाठी ऑइल पेंटचा वापर करतात,ज्यात झिंक ऑक्साइड, टायटॅनियम डायऑक्साइड, कॅडमियमसारखे त्वचेला घातक रसायने असतात. त्यामुळे बैलांच्या शिंगाना नैसर्गीक रंग द्यावा आणि शिंग साळणे शक्यतो टाळायला हवे. शिंग साळताना जखम झाली असल्यास उपचार करून धनुर्वात रोगप्रतिबंधक लस टोचून घ्या..काही शेतकरी बैल तजेलदार, मांसल व धष्टपुष्ट दिसावे म्हणून बैलांना तेलातून अंडी पाजतात. हे मिश्रण चुकीच्या पद्धतीने पाजताना बैल ठसकतात आणि मिश्रण अन्ननलिकेऐवजी श्वासनलिकेतून फुफ्फुसात जाते. त्यामुळे फुफ्फ़ुसाचा दाह म्हणजे न्यूमोनिया होऊन बैल दगावू शकतात. त्यामुळे मिश्रण पाजताना योग्य ती काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. बैलांना तेलातून अंडी पाजण्याऐवजी सरकी पेंड, शेंगदाणा पेंड यासारख्या तेलबियांच्या पेंडीतून आपण बैलांना अंडी देऊ शकतो..पोळ्याच्या दिवशी व त्याआधी बैलांना ज्वारीच्या पिठाचे गोळे व नैवेद्य म्हणून पुरणपोळ्या, कडधान्याचा भरडा चारला जातो. प्रमाणाबाहेर चारल्या जाणाऱ्या ऐवजामुळे बैलाला पोटाच्या व्याधी निर्माण होतात. रक्तातील लॅक्टिक ॲसिडचे प्रमाण वाढून जिवाला धोका निर्माण होतो. पोटाच्या व्याधीमुळे बाधित जनावर पोटाला लाथा मारते, दात खाते, जीभ चावते, चारही पाय वर करून उजव्या बाजूस लोळते. अशी लक्षणे दिसून आल्यास तत्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावे. तसेच बैलांना पचेल इतकच खाऊ घालावे आणि प्राथमिक उपचार म्हणून पाण्यासोबत खाण्याच्या सोड्याचे मिश्रण पाजावे. हे मिश्रण पाजताना जनावर ठसकणार नाही याची काळजी घावी..पोळ्याच्या दिवशी संध्याकाळी सजवलेल्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. फटाके वाजवले जातात. मोठा आवाज आणि गर्दीमुळे बैल बिथरतात. अशा वेळेस बैल उधळण्याची शक्यता असते. मिरवणुकीत बऱ्याच ठिकाणी बैल पळवले जातात. अनेक ठिकाणी दुर्घटना घडून बैल गंभीर जखमी होतात. काही बैलांना वेगाने पळण्याची सवय नसते म्हणून ती उधळतात आणि त्यांच्या आतड्याला पीळ पडण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी बैलांना फटक्यापासून दूर ठेवावे.- डॉ. अनिता जिंतूरकर, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र),डॉ. दीप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.