Kolhapur News: कृषिपंपांच्या केबल चोरीच्या प्रकाराने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी चक्क कृषिपंपावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आणि चोरटे अलगत जाळ्यात सापडले. रात्रीच्या अंधारात चोरट्यांना पकडण्यासाठी ग्रामस्थांनी दाखविलेले धाडसही तितकेच अधोरेखित करणारे आहे. .खन्नेट्टी (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांनी केबल चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. खन्नेट्टी गावच्या ग्रामस्थांनी एकजुटीतून दाखविलेले धाडस शेतकऱ्यांचे बळ वाढविणारे ठरले आहे..चंदगड तालुक्यात गेल्या सहा महिन्यांपासून कृषिपंपांच्या केबल चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. महागडी केबल चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. जवळपास २५ ते ३० लाख रुपयांची केबल चोरीला गेल्याचा अंदाज आहे..Agriculture Pump Theft: विद्युत मोटारचोरांमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकरी त्रस्त .शेतीसाठी आवश्यक असलेल्या वीजपुरवठ्यावर या चोरीचा मोठा परिणाम झाला आहे. केबल चोरीला गेलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. नदी काठावरील कृषिपंप, विहिरी तसेच तलावावरील कृषिपंपांच्या केबल रात्रीच्या वेळी तोडून चोरटे पसार होत होते. कामेवाडी, मलतवाडी येथील शेतकऱ्यांनी या बाबत पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी गस्त घालून चोरट्यांवर पाळत ठेवली होती; मात्र पोलिसांच्या हाती कोणतेच ठोस धागेदोरे लागत नव्हते.मलतवाडी तलावावर दोनवेळा केबल चोरीच्या घटना घडल्याने त्या ठिकाणचे शेतकरी मेटाकुटीला आले होते. केबल चोरीमुळे काही शेतकऱ्यांनी कृषिपंप बंद ठेवले होते. महागडी केबल चोरीला जात असल्याने कृषिपंप कसे सुरू करावेत, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. सातत्याने चोरीच्या घटना घडत होत्या..Agriculture Theft: आंबेगाव तालुक्यात दोन रोहित्रांची चोरी.या पार्श्वभूमीवर खन्नेट्टी येथील शेतकरी भरमू मोरे यांनी आपल्या किटवाड तलावावरील कृषिपंपावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविला होता. वाढत्या चोरीच्या घटनांवर उपाय म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा हा निर्णय पुढे इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला..चार दिवसांपूर्वी किटवाड धरण परिसरात चोरटे केबल चोरण्यासाठी आले असताना मोरे यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते स्पष्टपणे कैद झाले. सीसीटीव्हीत संशयास्पद हालचाली दिसताच मोरे यांनी तत्काळ अन्य ग्रामस्थांच्या मदतीने तलावाकडे धाव घेतली. चोरट्यांना कुणकून न लागता अंधारात ग्रामस्थांनी चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले..केबल चोरीसारख्या घटनांना आळाचोरीच्या घटनेतील चोरटे हे बाहेरगावचे असले, तरी सध्या ते चंदगड तालुक्यात वास्तव्याला असल्याचे निष्पन्न झाल्याने शेतकऱ्यांना धक्का बसला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे केबल चोरीसारख्या घटनांना आळा बसू शकतो, असा विश्वास शेतकरी वर्गात निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या या कृतीमुळे सामाजिक बांधिलकी व परस्पर सहकार्याचे दर्शन घडले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.