Akola News: यंदा कापूस खरेदीने वेग घेतला आहे. भारतीय कापूस महामंडळाकडून (सीसीआय) राज्यात २० लाख क्विंटल खरेदीचा टप्पा गाठला आहे. तर अकोला विभागातील जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत तब्बल १२ लाख क्विंटलहून अधिक कापूस खरेदी करण्यात आला आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदाची खरेदी लक्षणीयरित्या वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली..अकोला कार्यालयाच्या अखत्यारित जिल्ह्यांमध्ये ८४ खरेदी केंद्रे सुरू असून पुढील दोन ते तीन दिवसांत आणखी काही केंद्रे कार्यान्वित होणार आहेत. रविवारपर्यंत (ता. ७) झालेल्या खरेदीचा आढावा घेतला असता वेग आल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांची केंद्रांवरील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. अकोट येथील केंद्रावर तर सोमवारी सकाळपासून वाहने रांगेत उभी होती. गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे ७.७५ लाख क्विंटल खरेदी झाली होती. यंदा मात्र तब्बल ३ ते ३.५ लाख क्विंटलांनी अधिक खरेदी झाली आहे..CCI Cotton Procurement: एकरी पाचच क्विंटल कापूस खरेदीने शेतकरी हैराण.दरम्यान या हंगामात प्रथमच शेतकऱ्यांना मोबाईल अॅपद्वारे नोंदणीची अट घालण्यात आली आहे. नोंदणीवेळी तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पडताळणी, राज्य शासन यंत्रणेची पडताळणी प्रक्रिया, तसेच हेक्टरी उत्पादकतेची मर्यादा या अनेक अडथळ्यांमुळे प्रक्रिया संथ झाली होती. प्रत्यक्ष खरेदी सुरू झाल्यानंतर केंद्रांवर आर्द्रतेचा मुद्दाही चांगलाच गाजला. मात्र या सर्व अडथळ्यांवर मात करत खरेदी मोहिमेने आता गती पकडली आहे..Cotton Procurement: नांदेडला कापूस खरेदी कासव गतीने.उत्पादकतेच्या मर्यादेवर वाद कायम‘सीसीआय’च्या निकषांनुसार शेतकऱ्यांना हेक्टरी उत्पादन मर्यादा लागू आहे. अकोला जिल्ह्यात एकरी ५.६० क्विंटल उत्पादकता ग्राह्य धरली होती. या मर्यादेला शेतकरी, विविध संघटनांकडून तीव्र विरोध झाला. दबाव वाढताच कृषी आयुक्तालयाने नवीन पत्र जारी करत गेल्या हंगामातील उत्पादकता निकष खरेदीसाठी वापरण्याचे आदेश दिले. मात्र कोणती उत्पादकता अंतिम मानली जाणार या बाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले..शेतकऱ्यांच्या चकरा कायमकापूस विक्रीसाठी अॅपद्वारे नोंदणी करणे अनिवार्य केलेले आहे. नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांकडून काही चुका होत असून अनेक शेतकरी दुरुस्तीच्या कारणासाठी येथील सीसीआय कार्यालयात ये-जा करीत आहेत. नोंदणी केल्यानंतर त्रुटी दूर करण्यासाठी सीसीआयच्या कार्यालयाकडून परवानगी मागितली जाते. सोमवारी (ता. ८) अकोट तालुक्यातील काही शेतकरी केवळ त्रुटी दुरुस्तीच्या कारणाने आले होते. त्यांना तेथील बाजार समिती प्रशासनाने अकोल्यातून परवानगी आणण्याची सूचना केल्याने पदरमोड करून यावे लागले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.