CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ची कापूस खरेदी ५० लाख गाठींवर
Cotton Market Update: भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस खरेदी वेगाने सुरू आहे. देशात सीसीआयने आतापर्यंत ५० लाख गाठी कापसाची खरेदी केली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे १२ लाख गाठींची खरेदी झाली असून, सर्वाधिक २० लाख गाठी खरेदी तेलंगणात झाली आहे.