Warehouse Management Issues: कापूस खरेदीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना यवतमाळ येथील भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) गोदामात उघडकीस आली आहे. एमआयडीसी परिसरातील ‘नारायणी’ गोदामातून तब्बल ४५ कापूस गाठी गायब झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या गाठींची बाजारमूल्य सुमारे २० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण सरळ चोरीपेक्षा अपहाराचे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे..सीसीआयच्या तक्रारीनंतर अवधूतवाडी पोलिसांनी गोदामाची पाहणी करून चौकशी सुरू केली आहे. गोदामात एकूण १,८०० कापूस गाठींचा साठा असून त्यापैकी ४५ गाठींचा हिशोब लागत नसल्याचे निदर्शनास आले. प्रत्येक गाठीचे वजन सुमारे दोन क्विंटल असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणातील कापूस बाहेर नेणे सहज शक्य नसल्याचे तपास यंत्रणांचे मत आहे. .BT Cotton Seed Case: अप्रमाणित बीटी कपाशी नमुना प्रकरणी अंकुर सीड्स कंपनीची निर्दोष मुक्तता.विशेष म्हणजे गोदाम परिसरात चोवीस तास सुरक्षा व्यवस्था असून सीसीटीव्ही कॅमेरेही कार्यरत आहेत. त्यामुळे गाठी नेमक्या कशा गायब झाल्या, याबाबत संशय अधिक गडद झाला आहे. पोलिसांनी गोदामातील प्रत्येक लॉटची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या असून, एक-दोन गाठींच्या तफावतीऐवजी संपूर्ण ४५ गाठींचा फरक आढळल्याने अंतर्गत व्यवस्थापनावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. .Agriculture Department Inspection: निविष्ठा विक्रीतील गैरप्रकारांवर अंकुश?.कापूस खरेदी व साठवण प्रक्रियेत गोंधळाच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करण्याऐवजी काही ठिकाणी व्यापाऱ्यांकडून कमी दर्जाचा कापूस खरेदी केल्याच्या तक्रारी होत असतात. अशा परिस्थितीत सीसीआयच्या गोदामातूनच मोठ्या प्रमाणात कापूस गाठी गायब झाल्याचा संशय व्यक्त झाल्याने खरेदी व साठवण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा चर्चेत आल्या आहेत..अवधूतवाडी पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून, चोरी, अपहार किंवा लेखा-नोंदीतील त्रुटी यापैकी नेमके कारण काय, हे तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र २० लाख रुपयांच्या किमतीच्या ४५ कापूस गाठींचा हिशोब लागत नसल्याने सीसीआयच्या साठा व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.