Akola News: गेल्या काही वर्षांपासून पश्चिम विदर्भात कापूस खरेदी-विक्रीसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत यंदाही कापसाची जोरदार आवक सुरू आहे. केंद्र सरकारच्या कापूस महामंडळामार्फत (सीसीआय) हमीभावाने खरेदी होत असून आतापर्यंत अकोटमधील विविध केंद्रांवर एक लाख ३५ हजार क्विंटलपेक्षा अधिक कापसाची खरेदी पूर्ण झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली..अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत अकोट ‘अ’ आणि अकोट ‘ब’ अशी दोन मुख्य खरेदी केंद्रे कार्यरत असून चोहोट्टा बाजार हे तिसरे खरेदी केंद्र आहे. या तिन्ही केंद्रांवर चालू हंगामात कापूस विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, एकूण २८ हजार ९६३ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. यापैकी ११ हजार २३९ शेतकऱ्यांची बाजार समितीमार्फत पडताळणी करण्यात आली आहे..CCI Cotton Procurement: एकरी पाचच क्विंटल कापूस खरेदीने शेतकरी हैराण.पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत सहा हजार २८६ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कापूस विक्री केली आहे. अकोट ‘अ’ केंद्रावर २ हजार ४२६ शेतकऱ्यांनी ४८ हजार ३६९ क्विंटल कापसाची विक्री केली. अकोट ‘ब’ केंद्रावर १ हजार ७२८ शेतकऱ्यांनी ३८ हजार ३५५ क्विंटल कापूस विक्रीस आणला आहे..CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ कापूस खरेदी मर्यादा वाढवा.तर चोहोट्टा बाजार केंद्रावर २ हजार १३२ शेतकऱ्यांनी २८ हजार ५६८ क्विंटल कापसाची विक्री केली आहे. या तिन्ही केंद्रांवरील खरेदी एकत्रित केल्यास आतापर्यंत एकूण एक लाख ३५ हजार २९४ क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाली आहे. हमीभावाने खरेदी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना बराच दिलासा मिळत असून बाजारभावातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळाले आहे. .अकोट तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांचा येथील केंद्रावर सीसीआयच्या खरेदीकडे कल वाढलेला दिसून येत आहे. बाजार समिती प्रशासनाकडून खरेदी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करून कापूस विक्रीस आणावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.